औसा (प्रतिनिधी ) फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (FDP) शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यात आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सतत सुधारणा घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. हे कार्यक्रम शिक्षकांना सशक्त करण्यासाठी, नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी पद्धती अद्ययावत राहतील असे प्रतिपादन कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे यांनी समारोप भाषणात केले.
श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थे अंतर्गत आय क्यू ए सी - लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव ,लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर आणि चन्ना बसवेश्वर कॉलेज लातूर यांच्या संयुक्त विद्यमानाने फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले. प्रमुख अतिथी पुणे येथील आरोग्य लाभ फाऊंडेशन चे संचालक एस.बी.भिसे , कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष भिमाशंकर अप्पा बावगे , सचिव वेताळेश्वर बावगे ,कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, संचालक नंदकिशोर बावगे ,प्राचार्या डॉ श्यामलीला बावगे (जेवळे ) प्राचार्य श्रीनिवास भूमरेला उपस्थित होते .
या कार्यक्रमाची सुरवात सरस्वती मातेला दीप प्रज्वलन करण्यात आले.पाच दिवशीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये पहिल्या दिवशी नाशिक येथिल रॅप अनॅलिटीकल रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर चे संचालक पवार रोहन सविस्तर मार्गदर्शन केले.दुसऱ्या दिवशी एस बी भिसे . यानी शिबिरा अंतर्गत प्राद्यापकांना टीचिंग कशा प्रकारे करायची कोणती पद्धत वापरायची याबद्दल प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी पूना कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ आत्माराम पवार यांनी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये नॅशनल एजुकेशन पॉलिसी बद्दल माहिती सांगितली . वाय बी कॉलेज चे प्राचार्य ,डॉ एम ए देहगण यांनी एन बी ए, न्याक आणि नॅशनल एजुकेशन पॉलिसीयाबद्दल सविस्तर माहिती सांगितली . तसेचछत्रपती संभाजीनगर येथील गवर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ एस बी बोथरा यांनी पी एच डी आणि थेसिस याविषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. आणि चौथा दिवशी सोलापूर येथील आधार लाईफ सायन्स रिसर्च लॅब भेट देऊन इन्स्टंमेंट हँडलिंग चे प्रशिक्षण घेण्यात आले.पाचव्या दिवशी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये सहभागी झालेल्या सर्व प्राद्यापकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव महाविद्यालयासह , ज्ञानसागर विद्यालय,हासेगाव , लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी , लातूर, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था हासेगाव, गुरुनाथ अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर या सर्व युनिट चे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा.आयेशा पटेल यांनी केले.
إرسال تعليق