*शिवलिंग नागापुरे दिलासा राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्काराने सन्मानित*

दिलासा फाऊंडेशन लातूरच्या वतीने  भालचंद्र  ब्लड बँक लातूर येथे सामजिक , शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा दिलासा राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळा आयोजित केला होता.जिल्हा परिषद कन्या प्रशाला भादा ता.औसा येथे कार्यरत प्रयोगशील शिक्षक श्री शिवलिंग उमाकांत नागापुरे यांना दिलासा राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार देवून गौरविण्यात आले.सेवालय हासेगावचे प्रमुख सामजिक कार्यकर्ते प्रा. रवी बापटले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित दिलासा राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार सोहळ्यात शिवलिंग नागापुरे यांना लातूर विभागीय सहाय्यक शिक्षण उपसंचालक दत्तात्रय मठपती साहेब, सहाय्यक संचालक (माहिती) श्री श्याम टरके साहेब, पोलीस उपनिरीक्षक राणी बोंडवे,काँग्रेस विधी विभाग लातूर जिल्हाध्यक्ष तथा रेणा साखर कारखान्याचे संचालक ॲड.प्रवीण पाटील, शिक्षक प्रतिनिधी सभा (काँग्रेस) चे संस्थापक अध्यक्ष श्री कालिदास माने , शिक्षक काँग्रेसचे राजाध्यक्ष श्री दामाजी बालुरे, दिलासा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री दयानंदजी बिराजदार  युवती सेना जिल्हाध्यक्षा ॲड.श्रद्धा जवळगेकर , कवी योगिराज माने आणि ईतर मान्यवरांच्या हस्ते  प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देवुन सन्मानीत करण्यात आले.  शिवलिंग नागापुरे यांना यापूर्वी महाराष्ट्र शासन राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासह विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांना मिळालेल्या दिलासा राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कारामुळे त्यांचे समाजातील विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم