राज्यस्तरीय राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा सन्मान पुरस्काराने बालिका मुळे सन्मानित

राज्यस्तरीय राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा सन्मान पुरस्काराने बालिका मुळे सन्मानित
उदगीर-व्यसनमुक्ती परिषदेच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार संस्कार विद्यालयाच्या सहशिक्षका बालिका मुळे यांना देवून गुणगौरव करण्यात आला.
 हा पुरस्कार राज्यस्तरीय स्तरावर दिला जातो. हा पुरस्कार वितरण शानदार सोहळा 09 जुलै 2024 रोजी राजधानी मुंबई येथील वाय. बी. एम. हॉल येथे पार पडला. 
व्यसनमुक्त परिषदेच्या अध्यक्षाअंजली पाटील यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. 
बालिका मुळे व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. राज्यात व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणार्‍या संस्था साधन व्यक्ति विषयतज्ज्ञ व्यसनमुक्ती सेवाक्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ति संस्था समुउपदेशक  यांच्या कार्याला गती व व्यसनमुक्ती चळवळ महाराष्ट्रात बळकट व्हावी. या उद्देशाने पुरस्कार देवून गुणगौरव करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला व्यसनमुक्ती परिषदेचे सचिव प्रा. अजिनाथ  शेरकर  तसेच  प्रदेशाध्यक्षा प्राचार्य अंजली पाटील , राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नगराळकर , चंदन पाटील, गिरीश पाटील, तसेच पुरस्कार निवड  अधिकारी राजकुमार गवळे , राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचन्द्र पवार, जिल्हा अध्यक्ष संजय शेटे, आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم