महाराष्‍ट्र फार्मसीचा हैद्राबाद येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्‍न

महाराष्‍ट्र फार्मसीचा हैद्राबाद येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्‍न
निलंगाः महाराष्‍ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा व फार्मसी स्‍टुडन्‍स अल्‍युमिनी असोसिएशन निलंगा यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने शनिवार दिनांक ६ जुलै २०२४ रोजी हैद्राबाद येथील बचुपल्‍ली येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्‍न झाला. संस्‍था अध्‍यक्ष श्री विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली उत्‍साही वातावरणात संपन्‍न झालेल्‍या या मेळाव्‍यात माजी विद्यार्थ्‍यांचा उत्‍फुर्त प्रतिसाद लाभला.

     या मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्ष स्‍थानी माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्‍यक्ष तथा महाराष्‍ट्र फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एस पाटील होते. प्रमुख पाहुणे म्‍हणून माजी विद्यार्थी उद्योजक रमेश रेडडी, श्रीराम एन., डॉ.व्‍ही प्रसाद, महेश उटगे, संजयकुमार, हावगी डोंगरे, नागराज, अंतेश्‍वर पटवारी, डॉ अशिष मेहता, डॉ. ज्ञानेश्‍वर काळे, सदानंद येरोळे आदि मंचावर उपस्थित होते. 

   हैद्राबाद हे शहर देशात फार्मा उद्योगात अग्रेसर असुन, येथे अनेक नामांकित  फार्मा कंपनीचे उद्योग आहेत. या फार्मा कंपनीत महाराष्‍ट्र फार्मसी महाविद्यालयातील अनेक माजी विद्यार्थी उच्‍च पदावर कार्यरत आहेत.  या माजी विद्यार्थ्‍यात व सध्‍या महाराष्‍ट्र फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्‍यामध्‍ये समन्‍वय निर्माण करण्‍यासाठी व तसेच फार्मसी शिक्षण घेत असलेल्‍या नविन विद्यार्थ्‍यांना या क्षेत्रात उपलब्‍ध असलेल्‍या व्‍यवसाय व रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी माजी विद्यार्थी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. सर्व माजी विद्यार्थ्‍यांना मेळाव्‍यासाठी एकाच वेळी महाविद्यालयात उपस्थित रहाणे शक्‍य नसल्‍याने हा माजी विद्यार्थी मेळावा हैद्राबाद येथे घेण्‍यात आला.

     या मेळाव्‍याचे उदघाटन महाराष्‍ट्र फार्मसी महाविद्यालयाचे संस्‍थापक अध्‍यक्ष तथा माजी मुख्‍यमंत्री कै.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्‍या प्रतिमेस पुष्‍पहार अर्पण करुन व दिप प्रज्‍वलन करुन करण्‍यात आले.  मेळाव्‍यास मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. एस एस पाटील म्‍हणाले महाराष्‍ट्र फार्मसी महाविद्यालयाने मागील चाळीस वर्षापासून आपला गुणवत्‍तेचा आलेख उंचावत ठेवला असुन, सातत्‍याने महाविद्यालय प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.  आज महाविद्यालयात फार्मसी शिक्षण घेणा-या विद्यार्थ्‍यासाठी सर्व अत्‍याधुनिक सुविधायुक्‍त ग्रंथालय, प्रयोगशाळा, डीजीटल क्‍लासरुम, कॅम्‍पूटर लॅब यासह सर्व शैक्षणिक साधन सुविधा उपलब्‍ध आहेत.  महाविद्यालयाच्‍या वतीने विद्यार्थ्‍यांना विविध रोजगाराजाच्‍या व व्‍यवसायाच्‍या संधी उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी विविध उपक्रमाचे दर वर्षी आयोजन करण्‍यात येते.  माजी विद्यार्थ्‍यांनी सध्‍या फार्मसी शिक्षण घेत असलेल्‍या विद्यार्थ्‍यांना फार्मसी क्षेत्रातील भौतिक सुविधासह ऑनलाईन व ऑफलाईन मार्गदर्शन करुन विविध फार्मा कंपनीच्‍या वतीने आयोजित करण्‍यात येत असलेल्‍या प्रशिक्षणाची संधी उपलब्‍ध करुन द्यावी असे आव्‍हान करण्‍यात आले.

  यावेळी बोलताना प्रमुख अतिथी डॉ. प्रसाद, रमेश रेडडी, डॉ. अशिष मेहता, नागराज, सदानंद येरोळे, संजयकुमार, श्रीराम हावगी डोंगरे, गजानन लवंद, महेश उटगे, अंतेशवर पटवारी, डॉ.ज्ञानेश्‍वर काळे म्‍हणाले की, महाराष्‍ट्र कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील प्राध्‍यापकाच्‍या मार्गदर्शनामुळे व अध्‍यापनामुळे आज आम्‍ही आनेक नामांकीत फार्माकंपनीत उच्‍च पदावर काम करीत आहोत.  या पुढील काळात या क्षेत्रात येणा-या विद्यार्थ्‍यांना आम्‍ही व्‍यवसाय व रोजगार उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी सर्वोतपरी सहकार्य करण्‍याचे आश्‍वासन दिले व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्‍यांना गरजेनुसार ऑनलाईन व ऑफलाईन मार्गदर्शन करण्‍याचे आश्‍वासन त्‍यांनी यावेळी दिले. या मेळाव्‍याचे युटयुब लाईव्‍ह द्वारे थेट प्रेक्षेपन करण्‍यात आले होते.  मेळाव्‍याचे प्रास्तावीक प्रा.सुनिल गरड यांनी केले.  सुत्रसंचालन डॉ. चंद्रवदन पांचाळ यांनी केले तर आभार प्रा.इरशाद शेख  यांनी केले. या मेळाव्‍यास १०१ माजी विद्यार्थी उपस्थित होते.  या उपस्थितीत सर्व माजी विद्यार्थ्‍यांचा महाविद्यालयातर्फे सन्‍मान करण्‍यात आला.  कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी उद्योजक रमेश रेडडी, महेश उटगे, गजानन लवंद यांच्‍यासह महाविद्यालयाच्‍या प्राध्‍यापकांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم