जातनिहाय जनगणनेतूनच सर्वांना समान न्यायाची संधी- ॲड.कोमल साळुंखे ढोबळे

जातनिहाय जनगणनेतूनच सर्वांना समान न्यायाची संधी- ॲड.कोमल साळुंखे ढोबळेलातूर/प्रतिनिधी-बाराबलुतेदारासह मराठा आणि अन्य जातींना समान न्यायाची संधी जातीनिहाय जनगणना केल्यावरच उपलब्ध होईल असा आशावाद बहुजन रयत परिषदेच्या प्रदेश अध्यक्षा ॲड.कोमलताई साळुंखे ढोबळे यांनी व्यक्त केला आहे.
घटनेत भारतीय नागरिकांना आपल्या हक्कासाठी आंदोलन, मोर्चे, अशा प्रकारची सविधानिक अस्त्र बहाल केली आहेत. त्यामुळे आज मराठा बांधव आपल्या हक्कासाठी कोटीच्या संख्येने रस्त्यावर एकत्र येऊन आपल्या न्याय मागण्या सरकारकडे मागत आहे. त्यांचे असंख्य प्रश्न आज आहेत. शेतीचे प्रश्न सुटलेले नाहीत, मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव नाही, सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे. त्यामुळे हातात दाम नाही रोजगार नाही त्यातूनच प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. विरोधी पक्ष कमकुवत आहे, अशा वेळी आम्हांला रस्त्यावर उतरून लढाई केल्याशिवाय पर्याय नाही ही भूमिका आज मराठा तरुणांनी उघड घेतलेली आहे. यास उत्तर शोधायचं असेल तर देशभर जातनिहाय जनगणना केल्याशिवाय पर्याय नाही असं मत बहुजन रयत परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या लातूरातील मराठवाडा विभागीय कार्यकर्ता संवाद अभियान कार्यक्रमात व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी औसा पंचाय समितीचे माजी सदस्य दिपक चाबुकस्वार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश उपाध्यक्ष अशोक जाधव, बालाजी गायकवाड, सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर उपस्थित होते.
संवाद अभियान संपूर्ण राज्यभर असून प्रमुख कार्यकर्ते, नेते यांच्यासोबत बैठका घेऊन विचार विनिमय करुन आगामी विधानसभेत बाराबलुतेदारांना सर्व पक्षांनी समान राजकीय वाटा द्यावा अन्यथा, प्रस्थापितांचे किल्ले विस्थापित जनता उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका सुद्धा कार्यक्रमाच्या शेवटी आयोजित पत्रकार परिषदेत ॲड.श्रीमती साळुंखे ढोबळे यांनी घेतली.
त्या पुढे आपली भूमिका मांडताना म्हणाल्या की, परंपरेने चालत आलेली सर्व गावगाड्यातील बारा बलुतेदाराचे उद्योग धंदे आणि त्याचे अर्थकारण उध्वस्त झालंय, बारा बलुतेदारांची उदयोग धंदे आता आधुनिक तांत्रिक युगात भलत्याच लोकांनी गिळून टाकलीत, त्यामुळे खेडी ओस पडलेली आहेत. म्हणून शहराकडे तरुण मोठ्याप्रमाणात स्थलांतरीत झालेला आहे, त्यामुळे नव्या संदर्भाने अनेक समस्या नव्याने उद्भवल्या आहेत. यातूनच असंतोष निर्माण झालेला असून प्रचंड पराकोटीला पोहचला आहे.
समान न्यायाच्या शोधात आता बहुजन रयत परिषद संपूर्ण राज्यभर वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करेल, त्यातूनच देशाचे उज्वल भविष्य असणार असल्याची खात्री शेवटी कोमलताई साळुंखे ढोबळे यांनी बोलून दाखवली आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदेश कार्याध्यक्ष श्रीमंत गायकवाड, राजीव कसबे, नेताजी मस्के, शाम जाधव, यांनी परिश्रम घेतले. तर प्रास्ताविक राजीव कसबे यांनी केले असून, अध्यक्षीय समारोप दिपक चाबुकस्वार यांनी केला. सूत्रसंचालन शाम जाधव यांनी उत्तम रित्या केले, व आभार प्रदर्शन श्रीमंत गायकवाड यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم