श्री रामनाथ विद्यालयात ॲड.एस.एस.पाटील यांना अभिवादन

रामनाथ विद्यालयात स्व. अँड.एस.एस.पाटील यांना अभिवादन आलमला:-श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलमला ता. औसा येथे रामनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  स्व. ॲड.एस. एस. पाटील उर्फ बाबा यांच्या चौथ्या पुण्यतिथी दिनानिमीत्त विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आज दिनांक 29 जुलै 2024 वार सोमवार रोजी विद्यालयात संस्थेच्या प्राचार्या सौ. अनिता पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. शरण धाराशिवे यांनी स्व. अँड एस. एस. पाटील यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले .ग्रामीण भागात गोरगरिबांच्या मुलासाठी चालू केलेली ही शिक्षण संस्था त्याचे आज वटवृक्षांमध्ये रूपांतर झालेले आहे.ही बाबांच्या कार्याची सर्व परिसरातील विद्यार्थ्यांना फार मोठी देणगी आहे, असे गौरव उद्गार  याप्रसंगी त्यांनी व्यक्त केले. विद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सर्व कर्मचारी विद्यार्थी यांनी बाबांना अभिवादन केले.

Post a Comment

أحدث أقدم