सारथीच्या मराठा आणि कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा-प्रा.काशिनाथ सगरे

सारथीच्या मराठा आणि कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांनी  प्रवेश घ्यावा-प्रा.काशिनाथ सगरे
औसा/प्रतिनिधी-
"छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम” (CSMS-DEEP) अंतर्गत, महाराष्ट्र नॉलेज कापोरेशन लि. (MKCL), पुणे या प्रशिक्षण संस्थेमार्फत कॉम्प्युटर पार्क, औसा ता.औसा जि. लातूर येथे 
       कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम 'सारथी' संस्थेमार्फत आयोजित करण्यात आला.असून कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांअंतर्गत मराठा, कुणबी- मराठा मुला मुलींना १८ ते ४५ या वयोगटातील उमेदवाराकरिता सारथी संस्थेमार्फत निःशुल्क (मोफत) व्यक्तिमत्त्व व संगणक प्रशिक्षण व महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लि. (MKCL), पुणे या संस्थेमार्फत राबविण्यात येत असून लातूर जिल्हातील एमकेसीएलचे अधिकृत केंद्र कॉम्प्युटर पार्क औसा येथे प्रशिक्षण देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यासाठी आवश्यक असलेले स्किल्स शिकता येतील व स्वत:च्या पायावर उभे राहता येईल. तरी औसा तालुक्यातील मराठा व कुणबी मराठा विद्यार्थी विद्यार्थिनीने याचा लाभ घ्यावा असे आवाहन कॉम्प्युटर पार्क संचालक प्रा. काशिनाथ सगरे यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم