चन्नबसवेश्वर फार्मसी संस्थेचे शैक्षणिक , सामाजिक व संशोधनात्मक कार्य गौरवास्पद-शिवराज पाटील चाकूरकर

चन्नबसवेश्वर फार्मसी संस्थेचे शैक्षणिक , सामाजिक व संशोधनात्मक कार्य गौरवास्पद-शिवराज पाटील चाकूरकर 
लातूर :  आपल्या राजकीय - सामाजिक जीवनात आपण देशाच्या कानाकोपऱ्यात फिरलो, दौरे केले. पण लातूरच्या चन्नबसवेश्वर फार्मसी महाविद्यालयाएवढी चांगली संस्था आपल्याला कुठेही पाहायला मिळाली नाही, असे गौरवोदगार पंजाबचे माजी राज्यपाल तथा माजी केंद्रीय गृहमंत्री  शिवराज पाटील चाकूरकर यांनी काढले.
पंचाक्षरी शिवाचार्य ट्रस्टद्वारा संचलित  चन्नबसवेश्वर फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने बुधवारी श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार सोहळा शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  पंचाक्षरी शिवाचार्य ट्रस्टचे सचिव भीमाशंकर देवणीकर  हे होते. यावेळी डॉ. सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, एड. रुद्राणी पाटील चाकूरकर,  प्रदीप राठी, ज्येष्ठ विधिज्ञ गुरुनाथप्पा  ब्याळे , बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे, एड. सांबप्पा गिरवलकर, सौ. ललिताताई पांढरे, माधवराव पाटील, राजेश्वर बुके, बाबुराव तारगुडे, प्रभूअप्पा  पटणे , गुरुलिंगप्पा धाराशिवे , गंगा स्वच्छता प्राधिकरणचे सदस्य केशव पाटील, डॉ. जगन्नाथ पाटील, विजयकुमार मठपती गुरुजी, अनुप देवणीकर , अरुण हालकुडे , प्राचार्य डॉ.  विजयेंद्र स्वामी, प्राचार्य डॉ. संजय थोंटे आदी मान्यवरांची  व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनी चन्नबसवेश्वर फार्मसी महाविद्यालयाचे कार्य अत्यंत अतुलनीय व नेत्रदीपक असल्याचे सांगून या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच संशोधनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात असल्याबद्दल संधान व्यक्त केले. विज्ञानामुळे प्रगती अधिक गतीने होते. मात्र या ठिकाणी अध्यात्मासोबतच विज्ञानाचाही उत्कृष्ट प्रभाव दिसून येतोय. संशोधन आणि विकासासाठी विषयाची गोडी असणारी माणसे हवीत, पैशाची उपलब्धी हवी तेव्हाच हे कार्य शक्य होऊ शकते आणि ते या संस्थेने प्रत्यक्षात करून दाखविले आहे. केंद्र सरकार पुरस्कृत सामूहिक तंत्रनिकेतन योजनेच्या माध्यमातून विविध समाजाभिमुख उपक्रम सातत्याने संस्थेतर्फे राबविले जातात त्याचसोबत कौशल्य विकास प्रशिक्षण गरजू लोकांना देऊन कुशल मनुष्यबळ तयार केले जाते ज्याद्वारे   स्वयंरोजगार प्राप्त होतो हे कार्य देखील वाखाणण्यासारखे असल्याचे नमूद केले .
 अद्यावत संशोधन आणि विकास कार्याशिवाय आपण अन्य प्रगत राष्ट्रांशी बरोबरी करू शकत नाही. देशाच्या संरक्षण विषयक धोरणासाठीही त्या क्षेत्रातही संशोधन आणि विकास अत्यावश्यक बाबी आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठीही नवनवीन प्रकारची बी - बियाणे, खतांविषयी संशोधन होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे  जगण्यासाठी अन्नधान्यापेक्षाही माणसाचे आयुष्य कमी होऊ नये म्हणून संशोधन होणे गरजेचे असल्याचे चाकूरकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था संचालक विजयकुमार मठपती यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी संस्थेच्या आजपर्यंतच्या प्रगतीचा सविस्तर उल्लेख केला. आदिनाथ सांगवे यांनी सत्कारास उत्तर देताना या सन्मानाबद्दल आभार मानून  महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था सर्वांना  सोबत घेऊन शैक्षणिक क्षेत्रात अव्वल कार्य करेल असा विश्वास व्यक्त केला. सूत्रसंचालन प्रा . प्रताप भोसले व प्रा .जयश्री स्वामी यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ . संजय थोंटे यांनी केले .
कार्यक्रमास सौ. शितल अनुप देवणीकर , विश्वनाथ निगुडगे, रामदास भोसले, डॉ.उमेश कानडे, नागेश स्वामी, श्रीकांत हिरेमठ, लक्ष्मीकांत मंठाळे , उमाकांत कोरे, शैलेश स्वामी, बाबुअप्पा सोलापूरे यांसह  विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा . रवी राजूरकर, डॉ . अनंत देशपांडे , प्रा . बसवराज सुगावे , प्रा . रामलिंग सुगावे ,डॉ . ओमप्रकाश भुसनुरे , डॉ . शिवराज नागोबा , डॉ .. पद्मजा गिराम ,डॉ . राम साखरे , प्रा दत्ताहरी कवडेवार, डॉ . विवेक पंचभाई ,प्रा . अविनाश मठपती ,  डॉ . नसीर शेख , प्रा . रिशा वाले  ,प्रा . वर्षा गायकवाड ,प्रा . मोईन अत्तार , प्रा . प्रशांत बनसोडे , प्रा . रोहित कोंबडे , शिवहार विभुते , प्रदिप रामेगावकर , उमाकांत गचाटे ,गणेश स्वामी , ईश्वर डोंगरे ,काशीनाथ स्वामी , विशाल निलंगेकर , अमोल सोनकांबळे ,  शारदा स्वामी , संगीता  पवार ,स्वाती  आयतंबोने ,सिद्धेश्वर स्वामी , गणेश येरटे  , अंगद हाके , संगमेश्वर हुडगे ,  युवराज खुणे , अरुण स्वामी ,गुरुलिंग पिचे , अक्षय खंडापुरे विजयालक्ष्मी कुमठेकर , शिवसांब राचट्टे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم