महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा येथे जीपॅट नायपर 2024 परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह संपन्न

महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा येथे  
जीपॅट नायपर 2024 परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह संपन्न 
निलंगा/प्रतिनिधी- शहरातील महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा येथील 18 विद्यार्थ्यांनी 2024 या राष्ट्रीय पातळीवरील नामांकित परीक्षेत यश संपादन केले आहे. त्यानिमित्ताने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी संस्थेचे अध्यक्ष विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. जीपॅट ही राष्ट्रीय स्तरावरील पदव्युत्तर पदवी तसेच पीएचडी व फेलोशिप प्राप्त करण्यासाठी सर्वोच्च परीक्षा आहे तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासूटिकल एज्युकेशन अँड रिसर्च ही भारतातील सर्वोच्च फार्मासूटिकल संशोधन संस्था आहे.ही संस्था रसायन आणि खते मंत्रालयाच्या फार्मासूटिकल्स विभागाच्या अधिपत्याखाली स्वायत्त संस्था म्हणून कार्य करते. या दोन्ही परीक्षेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मागील 20 वर्षापासून ची यशस्वी परंपरा कायम राखत यावर्षीही उत्तुंग यश संपादन केले आहे या गुणगौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस. एस. पाटील सर, प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर भागवत पोळ, प्राचार्य महाराष्ट्र पॉलिटेक्निक डी. फार्मसी इन्स्टिट्यूट निलंगा तसेच डॉक्टर ज्ञानेश्वर चौधरी आय. क्यू.ए.सी.समन्वयक, महाराष्ट्र महाविद्यालय व मोहन नटवे, मुख्याध्यापक महाराष्ट्र विद्यालय हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे डॉ. भागवत पोळ  म्हणाले की सदरील परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी भारतातील सर्वोत्तम शैक्षणिक गुणवत्ता व नौकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांमध्ये प्रवेश घेऊन आपले फार्मसी क्षेत्रातील उत्तम करिअर करण्याचा प्रयत्न करावा यासोबतच विविध कौशल्य विकास आधारित कोर्सेस पूर्ण करावेत. डॉ. ज्ञानेश्वर चौधरी यांनी मार्गदर्शन करताना नमूद केले की या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी उत्तम महाविद्यालयाची निवड केल्यामुळेच यश संपादन करू शकले. रॉबर्ट  फोस्टर या नामांकित इंग्लिश कविच्या एका प्रसिद्ध कवितेचा उल्लेख त्यांनी यावेळी केला तसेच मोहन नटवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना या यशामध्ये आपल्या शिक्षक व आई वडिलांचे महत्त्व अधोरेखित केले व त्यांचे मनोबल वाढविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर शरद उसनाळे यांनी केले व डॉ. चंद्रवदन पांचाळ यांनी जी पॅट व नायपर परीक्षेचे संदर्भातील विविध स्कॉलरशिप व त्याबद्दल सध्या चालू असलेल्या घडामोडी बद्दल सखोल मार्गदर्शन केले. प्रा. सुनील गरड यांनी महाविद्यालयातील जीपॅट नायपर सेल कडून पुरवल्या जाणाऱ्या शैक्षणिक सुविधांबाबत माहिती दिली. 
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख अधोरेखित करत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थी व पालक यांचा यथोचित सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला व महाविद्यालयातून दरवर्षीप्रमाणे जीपॅट परीक्षेत प्रथम द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांस स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर,माजी मुख्यमंत्री तथा संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षण समिती यांच्या स्मरणार्थ रोख रुपये अनुक्रमे 5000/-, 3000/- व 2000/- देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी  डॉ. संतोष कुंभार, डॉ. माधव शेटकर, प्रा. सुजित पवार, प्रा. शिवराज हुनसनाळकर, प्रा. परवेज शेख, प्रा. सुरज वाकोडे, प्रा. नंदा भालके, प्रा. सानुली पौळकर, प्रा. विनोद उसनाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. इरशाद शेख तर आभार प्रदर्शन प्रा. रविराज मोरे यांनी केली कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Post a Comment

أحدث أقدم