किल्लारीत हर घर तिरंगा अभियान व विविध उपक्रम, ध्वज वंदन

किल्लारीत हर घर तिरंगा अभियान व विविध उपक्रम, ध्वज वंदन 
किल्लारी(प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्याला ७८ वर्ष पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्‌याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची भावना कायम स्वरूपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने हर घर तिरंगा अभियान व विविध उपक्रमनुसार ग्रामपंचायत किल्लारीच्या वतीने
ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच सुलक्षणा धनराज बाबळसुरे यांच्या हस्ते ध्वज फडकवून ध्वज वंदन करण्यात आले.
या अभियानाचा एक भाग म्हणून गावातील सर्व घरे, दुकाने व सर्व शासकीय कार्यालये व खाजगी आस्थापना यावर दिनांक १३, १४ व १५ ऑगस्ट २०२४ रोजी तिरंगा झेंडा फडकविण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने  यावेळी हुतात्मा स्मारक परिसरात स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. 
यावेळी ग्रामविकास अधिकारी शोभा भोजने, ग्रामपंचायत सदस्य  बबीता कांबळे, वैशाली गुंजोटे, सुमन भोसले, गोविंद भोसले, विजय माने, विजयकुमार भोसले, मेजर राठोडे, पांडुरंग भोसले, अमोल कोराळे, शाहूराज वाळके, अरबाज पठाण, सचिन सरवदे, जोती बाबळसुरे आदी कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते. 

Post a Comment

أحدث أقدم