रामनाथ अध्यापक विद्यालयाची जाधव प्रियंका रमेश अध्यापक विद्यालयातून प्रथम

 रामनाथ अध्यापक विद्यालयाची जाधव प्रियंका रमेश अध्यापक विद्यालयातून प्रथम
आलमला/प्रतिनिधी -श्री रामनाथ अध्यापक विद्यालय अलमला ता.औसा जि. लातूर या विद्यालयाचा जून 2024 या चालू शैक्षणिक वर्षातील अध्यापक विद्यालयाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यालयातून विशेष प्राविण्‍यामध्ये जाधव प्रियंका रमेश या विद्यार्थिनींनी 85 टक्के गुण घेऊन विशेष प्राविण्यासहविद्यालयातून प्रथम आलेली आहे  तर द्वितीय मायंदे प्रीती संतोष 83.10% गुण घेऊन विशेष प्राविण्य मिळवले आहे. तर तृतीय पाटील सोनाली बाळू ८१.६० टक्के गुण घेऊन विद्यालयातून तृतीय आलेली आहे. चालू शैक्षणिक अध्यापक विद्यालयातून प्रथम श्रेणी पाच विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष अडवोकेट उमेश पाटील, उपाध्यक्ष शिवाजी अंबुलगे, सचिव श्री प्रभाकर कापसे ,सहसचिव नंदकिशोर धाराशिवे, कोषाध्यक्ष चंनबसप्पा निलंगेकर सर्व संचालक मंडळ यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे त्यात प्राचार्य श्री कांचन कुलकर्णी, प्रा.श्री श्याम कोकाटे ,प्रा.फाजल फयाज, प्रा. सौ दीपश्री उकरडे यांचे अभिनंदन केले आहे व त्यांना द्वितीय सत्रासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.

Post a Comment

أحدث أقدم