महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जीपॅट नायपर संबंधित एक्सपर्ट लेक्चर संपन्न

महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जीपॅट नायपर संबंधित एक्सपर्ट लेक्चर संपन्न
निलंगा/प्रतिनिधी- शहरातील महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी, निलंगा येथे  मागील 25 वर्षापासून सातत्याने देश पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासंदर्भात जी पॅट सेल तर्फे तज्ञांचे व्याख्यान आयोजित करण्यात येते. त्याअंतर्गत द्वितीय पुष्प गुंफताना डॉ. विजयकुमार चाकोते माजी विद्यार्थी तथा संचालक, फार्मास्टार अकॅडमी, नांदेड यांचे जी पॅट परीक्षा पास होण्याचा मूलमंत्र यावर दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. डॉ. विजयकुमार चाकोते यांनी आपल्या व्याख्यानात मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना परिक्षेचे स्वरूप, विषयांची ओळख, अभ्यासातील सूक्ष्म बारकावे, विविध विषयातील अभ्यास लक्षात ठेवण्याचा युक्त्या अत्यंत सुलभ मनोरंजक व सोप्या पद्धतीने समजावून सांगितल्या. या अनुषंगाने कार्यक्रमाची सुरुवात करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एस.पाटील यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सुनील गरड यांनी केले, सोबतच राहुल हजगुडे माजी विद्यार्थी प्रोजेक्ट डाटा मॅनेजर (सीडीएम) सायनो हेल्थ मुंबई यांनीही महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली. आभार प्रा.रविराज मोरे यांनी मांडले. 
सर्व उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक व शिकेत्तर कर्मचारी यांना भारतीय अवयव दान दिनानिमित्त प्रतिज्ञा देण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर जाधव, व्यंकट गार्डी, डॉ. चंद्रवदन पांचाळ, डॉ. शरद उसनाळे, प्रा. नंदा भालके, प्रा. सानुली पौळकर, प्रा. सुजित पवार, प्रा. विनोद उसनाळे, प्रा. सुरज वाकोडे, प्रा. शिवराज हूनसनालकर,  डॉ. संतोष कुंभार, डॉ. माधव शेटकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم