श्री भीमाशंकर आप्पा बावगे यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्टर सादरीकरण स्पर्धा

श्री भीमाशंकर आप्पा बावगे यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्टर सादरीकरण  स्पर्धा
        औसा प्रतिनिधी-श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर आप्पा बावगे यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर, लातूर कॉलेज ऑफ  सायन्स लातूर,राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलीटेक्निक लातूर, आणि लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी लातूर यांच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयांमध्ये पोस्टर सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये विविध विषया मधील १०२ पोस्टरांचा  सहभाग नोंदवला गेला. या कार्यक्रमाला पंच म्हणून डॉ प्रताप भोसले चन्नाबसवेश्वर फार्मसी महाविद्यालय लातूर, डॉ जयदीप यादव प्राचार्य डी बी फार्मसी महाविद्यालय महारंगळा, डॉ.सुनील गरड महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा, श्री सी.जी पाटील माजी उपप्राचार्य कुमार स्वामी महाविद्यालय औसा,  डॉ. सुचित्रा भालचंद्र स्त्रीरोगतज्ञ,  ,डॉ.जे सी राठोड शासकीय निवासी महिला तंत्र निकेतन महाविद्यालय लातूर हे प्रमुख पाहुणे  लाभले. प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, सन्मामचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.  प्रमुख उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे , सचिव वेताळेश्वर बावगे ,कोषाध्यक्ष शिवलिंग जवळे ,नंदकिशोर बावगे, सौ. माधुरी  बावगे तसेच प्राचार्य डॉ. श्रीनिवास बुमरेला,प्राचार्य डॉ. वीरेंद्र मेश्राम, प्राचार्य संतोष मेदगे, प्राचार्या योगिता बावगे, प्राचार्य राजशेखर चौधरी, शुभम वैरागकर. तसेच पोस्टर सादरीकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم