खा.डॉ.अजित गोपछडे यांचा रामनाथ सभागृहासाठी निधी

खा.डॉ.अजित गोपछडे यांचा रामनाथ सभागृहासाठी निधी आलमला:- रामनाथ शिक्षण संस्था ता. औसा येथे खा. डॉ अजितजी गोपछडे यांची वीरशैव लिंगायत सन्मान यात्रा आली होती त्यानिमित्त रामनाथ विद्यालयांमध्ये त्या यात्रेचे स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अँड.उमाशंकर पाटील अध्यक्ष रामनाथ शिक्षण संस्था हे उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून भाजप नेत्या डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यात्रा संयोजक, श्री नितीन शेटे जि.प माजी सदस्य, बसवराज पाटील कौलखेडकर औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक,श्री भीमाशंकर राचटे ,संस्थेचे सचिव श्री प्रभाकर कापसे सहसचिव प्रा. नंदकिशोर धाराशिवे संचालक, प्रा.जी.एम. धाराशिवे ,नरेंद्र पाटील, प्राचार्य  सौ.अनिता पाटील, लातूर म.न.पा.माजी सदस्य संगीत रंदाळे, शैलेश स्वामी, युवा उद्योजक खंडू मलके, शिवशंकर धाराशिवे  इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रथम संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचा शाल, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे सचिव प्रभाकर कापसे यांनी आपल्या प्रास्ताविकांमधून  आपल्या खासदार निधीतून रामनाथ शिक्षण संस्थेसाठी सभागृहाची मागणी केली  याप्रसंगी प्रमुख अतिथी डॉक्टर सौ अर्चना पाटील चाकूरकर यांनीही सर्वांना मार्गदर्शन करून आपल्या संस्थेत यापूर्वीही अनेकांनी भरीव मदत केलेलीच आहे. आणि आपले नूतन खासदार हे देखील निश्चित रामनाथ संस्थेसाठी मदत करतील अशी आशा व्यक्त केली आणि सर्वांना गौरी .गणपती सणाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी डॉ. खा. अजितजी गोपछडे साहेब यांनी रामनाथ शिक्षण संकुलातील विविध युनिट ची माहिती घेतली. ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलासाठी चालू असलेल्या या शिक्षण क्षेत्रातल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि मी माझ्या खासदार निधीतून रामनाथ सभागृहासाठी निधी देऊन एक उत्तम दर्जाचे सभागृह निर्मिती करण्याचा संकल्प केला आणि वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेच्या पाठीमागचा उद्देश  सांगून आपण यापुढे आपला खासदार निधी चांगल्याच कामासाठी खर्च करणार आहे असे अभिवचन दिले.या कार्यक्रमासाठी विकास सोसायटीचे चेअरमन विश्वनाथ बिराजदार,सरपंच विकास वाघमारे,उपसरपंच इरफान मुलानी , भाजपा युवा कार्यकर्ते कमलेश निलंगेकर, दौलत वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य  शिवकुमार पाटील, ऍड. संगमेश्वर पाटील,शिवाजी कुंभार व गावातील विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते, कार्यक्रम संपल्यानंतर यात्रा संयोजकाच्या वतीने डॉ. खासदार साहेबांनी सर्व संस्था चालकाचा सन्मान चिन्ह व महावस्त्र देऊन सत्कार केला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पर्यवेक्षक श्री.पी.सी. पाटील सर यांनी केले तर आभार श्री भास्कर सूर्यवंशी यांनी मांडले.

Post a Comment

أحدث أقدم