एसव्हीएसएस शिक्षण संकुल लातूर मध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा
लातूर/प्रतिनिधी-श्री वेताळेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ लातूर, अंतर्गत लातूर कॉलेज ऑफ फार्मसी ,लातूर लातूर कॉलेज ऑफ फिजिथेरपी, राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक, एसव्हीएसएस लातूर ऑफ नर्सिंग (जीएनएम) लातूर कॉलेज ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमानाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ.रमाकांत घाडगे अध्यक्ष आंतरविद्याशाखीय अभ्यास मंडळ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे,सचिव वेताळेश्वर बावगे, संचालिका सौ.माधुरीबावगे, नंदकिशोर बावगे, प्राचार्य डॉ श्रीनिवास बुमरेला, प्राचार्य डॉ विरेंद्र मेश्राम, प्राचार्य संतोष मेदगे, सोनहिवरे माधव , शुभम वैरागकर, क्षितिजा माळी,उपस्थित होते. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना डॉ रमाकांत घाडगे यांनी भविष्यामध्ये फार्मसी ला खूप महत्त्व आहे जिद्दी व प्रामाणिकपणाने अभ्यास करा यश शंभर टक्के मिळेल असे प्रतिपादन केले. तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामात ज्या स्वातंत्र वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा शहीद झालेल्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप प्राचार्य डॉ श्रीनिवास बुमरेला यांनी केले. या कार्यक्रमाला संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
إرسال تعليق