भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आलमला येथील वाचनालयाचे उद्घाटन

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आलमला येथील वाचनालयाचे उद्घाटन
आलमला- आलमला ता. औसा जि. लातूर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे नागसेन नगर आलमला येथे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रभाकर कापसे अध्यक्ष लातूर जिल्हा ग्रंथालय संघ. श्रीमती जयश्री कोरे जि.प शाळा शिक्षिका, विश्वनाथजी बिराजदार विकास सोसायटी  चेअरमन, शिवकुमार पाटील जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,श्री विकास वाघमारे सरपंच.
 यांच्या उपस्थितीत व गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत वाचनालयाचे उद्घाटन झाले .
माननीय प्रभाकर कापसे सर यांनी अलमला गावातील  सामाजिक कार्यात सदैव सक्रिय असणाऱ्या सर्व नागरिकांचे योगदान खूप अमूल्य आहे असे सांगितले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने व विचाराने प्रेरित झालेल्या युवकांनी गावामध्ये वाचनालयाची संकल्पना केली ही खूप आनंदाची व प्रेरणाची बाब आहे असे मनोगत व्यक्त केले नेताजी वाघमारे .अण्णाराव वाघमारे .भीमराव लांडगे विजयकुमार लांडगे. केरप्पा वाघमारे. महादेवराव वाघमारे. दौलत वाघमारे .गोरख वाघमारे .
या बांधवांनी वाचनालयाची संकल्पना अस्तित्वात आणल्याबद्दल खूप खूप आनंद व्यक्त केला वाचनालयाची संकल्पना निर्माण करणारे नेताजी वाघमारे यांना असेच सामाजिक कार्य करण्यासाठी पुढाकार घ्यावा व विविध कार्यक्रम आयोजित करून समाजातील विद्यार्थी. नागरिक. ज्येष्ठ नागरिक महिला .यांना विविध कला कौशल्य व बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी हे वाचनालय खूप प्रेरणादायी ठरेल असे मनोगत व्यक्त केले. सरपंच विकास वाघमारे यांनी वाचनालयाच्या इमारतीसाठी व सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी ग्रामपंचायत सहकार्य करेल असे आश्वासन केले.  कार्यक्रमासाठी आर्थिक व पुस्तके ग्रंथ उपलब्ध करून देणाऱ्या सर्व बांधवांचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم