पद्मावती विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील यांच्या सेवापुर्ती निमित्त सत्कार सोहळा लातूर. श्री पद्मावती विद्यालय मुरढव ता.रेणापूर या विद्यालयाचे मुख्याध्यापक आर सी पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्त दि. 28 ऑक्टोबर 2024 रोजी विद्यालयांमध्ये त्यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मोहनराव जाधव हे उपस्थित होते .तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ सुनिता चवळे डॉ. सतीश यादव गावचे सरपंच लक्ष्मण यादव, रेनाचे संचालक धनराज देशमुख, गावातील प्रतिष्ठित मंडळी श्री वसंत यादव, युवराज पाटील, संतोष दाने, रवींद्र देशमुख, आकाशदीप चव्हाण, सुभाष चव्हाण, इत्यादी मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होते. सर्वप्रथम त्यांची गावांमधून बैलगाडी सजवून ग्रामदैवत हनुमान मंदिराच्या समोर त्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करून गावातून विद्यालयापर्यंत त्यांची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर विद्यालयाच्या प्रांगणात त्यांचा गावातील विविध संस्थेच्या वतीने व त्यांचे मूळ गाव येलोरी ता.औसा येथील ग्रामस्थांच्या वतीने फेटा शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे डॉ सुनिता चवळे प्रा. डॉ. सतीश यादव यांनी आर सी पाटील यांनी या विद्यालयात 20 शिक्षक व 15वर्षे मुख्याध्यापक म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल व त्यांनी संस्थेची गुणवत्ता वाढवण्यासाठी राबवलेल्या विविध उपक्रमाबद्दल तसेच त्यांनी अनेक क्षेत्रातही केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव उद्गार काढले ते शांतिनिकेतन पतसंस्थेचे चेअरमन म्हणून व लातूर स्काऊट गाईड जिल्हा कोषाध्यक्ष म्हणून केलेले कार्य कौतुकास्पद आहे . असे गौरव उद्गार याप्रसंगी दोन्ही प्रमुख अति त्यांनी काढले तसेच अध्यक्ष समारोप करतेवेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मोहनराव जाधव यांनीही आर सी पाटलांच्या कार्याचा गौरव करून पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना श्री आर सी पाटील यांनी आपणाला या गावात नोकरीची संधी उपलब्ध करून देणारे शिक्षण महर्षी डी बी लोहारी गुरुजी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष कै. गोविंदराव देशमुख सचिव कै नारायणराव सावंत नारायणराव यादव यांच्या प्रति प्रथम ऋण व्यक्त केले व मला या मुरढव गावातील सर्व नागरिकांनी काम करण्यासाठी खूप मोठी मदत केली त्या सर्वांच्या प्रेमामुळे मी आज भारावून गेलो आहे 35 वर्ष माझी या गावात व गावच्या परिसरातील घनसरगाव, चुकारवाडी, पाथरवाडी पानगाव या परिसरातील सर्व माझे विद्यार्थी व मित्रपरिवार बनत गेले त्यांनी मला व मी त्यांना एका कुटुंबाप्रमाणेच कार्य करत राहिलो संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांनीच मला खूप मोठी मदत केली म्हणून मी या परिसरात संस्थेत शिक्षण क्षेत्रात चांगले काम करू शकलो याचा मला नेहमी आनंद आणि गर्व राहिला आहे. त्याबद्दल मी सर्वांचा आयुष्यभर ऋणी राहीन असे भाव उद्गार काढले याप्रसंगी श्रीआर सी पाटलाच्या हाताखाली शिकलेल्या असंख्य विद्यार्थ्यांनी त्यांचा यथोचित गौरव केला व आपल्या काही उल्लेखनीय आठवणी सराप्रती व्यासपीठावरती व्यक्त केल्या तेव्हा सर्वांनाच या निरोप समारंभाची हुरहुर लागून राहिलीआहे . याप्रसंगी आर सी पाटलांचे मित्रपरिवार स्नेही मित्रमंडळी विद्यार्थी असंख्य क्षेत्रातील मान्यवर तालुक्यातील मुख्याध्यापक परिसरातील पालक विद्यार्थी उपस्थित होते . याप्रसंगी आर सी पाटलांनी सर्व ग्रामस्थांना स्नेहभोजनासाठी निमंत्रित केले होते. त्याचा सर्वांनी पाहुणचार घेतला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस बी साबदे यांनी केले तर सूत्रसंचालन डी एम धनवे यांनी केले तर आभार बी एस सूर्यवंशी सरांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुरढव ग्रामस्थ व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .
पद्मावती विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील यांच्या सेवापुर्ती निमित्त सत्कार सोहळा
www.swaranpushp.com
0
إرسال تعليق