आर्य वैश्य युथ संघटनेचा अनोखा उपक्रम खुशीग्राम प्रकल्पास फ्रिज, कपडे व दिवाळी फराळ देऊन केली दिवाळी साजरी

आर्य वैश्य युथ संघटनेचा अनोखा उपक्रम खुशीग्राम प्रकल्पास फ्रिज, कपडे व दिवाळी फराळ देऊन केली दिवाळी साजरी
लातूर-शहरातील सुभेदार रामजी नगर येथील खुशीग्राम प्रकल्प लातूर येथे आर्य वैश्य युथ या संघटनेकडून लहान मुलांना कपडे व दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.
तसेच दिवाळी फराळ व कपडे वाटप करत असताना येथील व्यवस्थापक सोनवणे सर यांनी खुशी ग्राम प्रकल्प याविषयी आर्य वैश्य युथ या संघटनेचे पदाधिकारी यांना खुशीग्राम प्रकल्पाविषयी माहिती दिली. बातचीत करत असताना काही गोष्टी विचारल्या त्यांनी त्याची उत्तरे दिली परंतु असे बोलत असताना असे आढळून आले की, त्यांना फ्रिज ची गरज आहे लगेचच  आर्य वैश्य युथ या संघटनेचे पदाधिकारी यांनी बैठक घेऊन खुशीग्राम प्रकल्प फ्रिज देण्याचे ठरवले व लगेचच त्यांना फ्रीज देण्यात आले.
यावेळी आर्य वैश्य युथ या संघटनेचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष व्यंकटेश देवशेटवार यांच्या मुलीचा प्रथम वाढदिवस साजरा करण्यात आला.वाढदिवस साजरा करत असताना येथील लहान मुलांचा 2025 मध्ये पुस्तके व शालेय दप्तर देऊ असे सांगितले.केदार बट्टेवार यांनी खुशीग्राम प्रकल्पास 11000 रुपयाची ख़ुशी ग्राम प्रकल्प या जागेचे भाडे म्हणून मदत केली.
या कार्यक्रमाचे  प्रस्ताविक प्रा. रेणुका पाटील यांनी केले व आभार मराठवाडा सचिव निखिल गुजलवार यांनी मानले. यावेळी आर्य वैश्य जिल्हाध्यक्ष विठ्ठल तगलपलेवार,उपाध्यक्ष प्रीतम कोंडेवार,जिल्हा सचिव अजय कोटलवार, मराठवाडा सचिव निखिल गुजलवार, कोषाध्यक्ष सचिन पापीनवार, केदार बट्टेवार,स्वप्नील देबडवार, प्रसाद चिगळे,सुमित देवशेटवार, विकास चल्लावार,विनोद चल्लावार,प्रीती तगलपल्लेवार, शुभांगी कोंडेवार,प्रिया देवशेटवार,प्रियंका कोटलवार आदी.उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم