क्रांती संगम फाउंडेशनच्या वतीने आ.अभिमन्यू पवार यांचा सत्कार

क्रांती संगम फाउंडेशनच्या वतीने आ.अभिमन्यू पवार यांचा सत्कार 
लातूर -पुणे येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या ओमएमएस पुणे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाचे अध्यक्ष शिवलिंग जेवळे यांनी सर्वांचे आवडते, लातूरचे सुपुत्र कोणत्याही कार्यासाठी, मदतीसाठी स्वताला झोकून देणारे, गरिब श्रीमंत भेद न करणारे औसा मतदार संघाचे लोक प्रिय आमदार श्री अभिमन्यू पवार साहेब यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करुन आभार मांडले.
 या प्रसंगी लातूर जिल्हा भाजप पक्षाचे प्रभारी संतोष मुक्ता, बसव ग्रुप सदस्य वाले सुर्यकांत, खपाटे सर, श्रीनिवास मेदकुदळे, रोहित चवळे आदी.उपस्थित होते. ओमएसएस पुणे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी पुणे या महविद्यालयाच्या मान्यते साठी आ.अभिमन्यू पवारांनी मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना शिफारस करुन मोलाचे सहकार्य केले व पुणे जे विद्येचे माहेर घर आहे. आशा ठिकाणी आपला लातूर पॅटर्न तयार करा असे सांगून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयमध्ये नियमाप्रमाणे सुसज्ज लॅब, डिजिटल लॅबररी, डिजिटल क्लास रूम, क्रीडा मैदान तसेच सुसज्ज हॉस्पिटल असल्याची माहिती अध्यक्ष शिवलिंग जेवळे यांनी आ.पवार यांनी दिली.
आताच्या काळात फिजिओथेरेपी डॉक्टरांची आवश्यकता ही खूप पड़त आहे. तसेच या कॉलेजच्या माध्यमातून अनेक रुग्णांना उपचार घेता येतील.ही संकल्पना समोर ठेवून क्रांती संगम फाऊंडेशन अध्यक्ष शिवलिंग जेवळे सचिव संगमेश्वर पाटील दोघांनी मिळून कॉलेजची निर्मिती केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم