सिध्देश्वर कॉलेज ऑफ फार्मसीमधे मतदान जन-जागृती
लातूर-मतदान जन- जागृती साठी सिध्देश्वर कॉलेज ऑफ फार्मसी विध्यार्थी ची रॅली काढण्यात आली रॅली मध्ये यश हाळे याने "आपले मत आपले भविष्य " मतदान करु चला चला जनहिताचे शासन आणू ' "जागरुक मतदार लोकशाहीचा आधार " तोच देश होईल महान ज्या देशात शंभर टक्के मतदान.अशाप्रकारे घोषवाक्ये सांगितले.अनेक महाविद्यालय जाऊन तेथील अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांना मतदान करण्याचे महत्त्व सांगताना, अजित डोरनाळेकर याने मतदान करणे हा आपला हक्क आहे एक-एक मतदान हे खूप अमूल्य आहे. मतदान जागृती म्हणजे लोकांना मतदानाचे महत्व आणि त्यांचा अधिकार समजावून सांगणे, मतदान हे लोकशाहीचे हृदय आहे. असे त्याने सांगितले . तसेच दीक्षा गोरे, महेक तांबोळी, आदित्य , नविन चव्हाण,यश हाळे , सर्व विद्यार्थी नी सुंदर असे मतदान जनजागृती पथनाट्य सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन आयुष गुंजरगे याने केले. या कार्यक्रमास डॉ.शामलीला बावगे,प्रा आकाश पाटील,प्रा उषा भुईबार ,प्रा.सुप्रिया शेळके,प्रा.सागर शिवनगे ,ग्रंथपाल अलका कोरे आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
إرسال تعليق