महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा
   निलंगा-दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देणे हा होता. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील यांनी महिला दिनाचा इतिहास सांगून कार्यक्रमाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती के. पी. गाडे (दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, निलंगा), सौ. वैशाली इंगळे (गजानन अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज, मुबारकपूर) व श्रीमती व्ही. व्ही. कुलकर्णी (विधिज्ञ) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि आत्मनिर्भरतेवर विशेष भर दिला.
या कार्यक्रमात कॉलेजमधील सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. नंदा भालके यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. सी. व्ही. पांचाळ, डॉ. एस. व्ही. गरड, डॉ. एस. व्ही. उसनाळे, प्रा. एस. ए. गुंड आदींनी सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم