अनाधिकृत पाणी चोरी करणाऱ्या नगरसेवका विरोधात कार्यवाही करा-मनपा आयुक्तांकडे प्रभाग 16 मधील नागरिकांची तक्रार
लातूर प्रतिनिधी : लातूर शहराची पाणी टंचाई सर्वज्ञात असून सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकने नित्याचे झाले आहे. एकीकडे सर्वसामान्य लातूरकर पाणी टंचाईला तोंड देत असताना नगरसेवकांच्या घरात 2 अनाधिकृत नळ आढळून आलेले आहेत. याप्रक्रणी मनपाने पंचनामाही केलेला असुन नगरसेविकेला नोटीस बजावण्यात आलेली आहे. मात्र केवळ नोटीस न बजावता त्या नगरसेविके विरोधात कार्यवाही करुन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी प्रभाग 16 मधील नागरिकांनी निवेदनाच्या माध्यमातून मनपा आयुक्त, मानसी मीना यांना दिले आहे.
लातूर शहराला पाणी टंचाई नवीन नाही. पाण्यासाठी वणवण भटकणे लातूरकरांना नित्याचे झालेले असुन धरणात पाणी असून ही नागरिकांना पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे. एकीकडे सर्वसामान्य नागरिक पाणी टंचाईने त्रस्त झालेला असताना मनपा लोकप्रतिनिधीच्याच घरात पाणी पुरवठा करणाऱ्या तीन नळ जोडण्या आढळून आलेल्या आहेत. यार्पकी दोन नळ जोडण्या अनाधिकृत असल्याची तक्रार यापूर्वी प्रभाग 16 च्या नागरिकांनी दिलेली होती. तक्रारदारांनी दिलेल्या तक्रानी नुसार मनपा प्रशासनाने प्रभाग 16 च्या नगरसेविका राजेश्री धोत्रे व त्यांची पती अंकीत बाहेती यांच्या घरी जावून मनपा प्रशासनाने याबाबत पंचनामा केला. या पंच नाम्यात 3 पैकी एक नळ रुक्मिणी तुकाराम धोत्रे यांच्या नावे असून इतर 2 नळ अनाधिकृत असल्याचे किंवा याबाबत मनपा दप्तरी कोणतीच नोंद आढळून आली नाही.
याप्रकरणी मनपा प्रशासनाने नगरसेविका राजश्री धोत्रे (बाहेती) व अंकित बाहेती यांना नोटीस बजावून अनाधिकृत नळ जोडण्या अधिकृत करुन घ्याव्यात अशी नोटीस बजावली आहे. मात्र प्रभाग 16 मधील नागरिकांनी नगरसेविका राजेश्री धोत्रे (बाहेती) व अंकित बाहेती यांच्या विरोधात गुन्हा नोंद करुन दोन्ही अनाधिकृत नळ सिल करण्यात यावेत तसेच त्यांच्याकडून अनाधिकृत पाणी वापराची थकबाकी व व्याजासह दंड वसुल करावा अशी मागणी मनपा आयुक्त मानसी मीना यांच्याकडे केली आहे. याप्रकरणी कार्यवाही न झाल्यास बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा ही दिलेला आहे.
या निवेदनावर मनोज अभंगे, संजय आयाचित, प्रशांत गवंडगावे, विनोद वाकडे, शिवशंकर कावळे, सुभाष वर्मा, विनोद माटेफळकर, गुंडेराव डेंगळे, शिवप्रसाद मालू, पंडीत येलाले, चंद्रकांत सुर्यवंशी, एस. एस. वर्मा आदींच्या स्वाक्षरी आहेत.
إرسال تعليق