सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले यांना अभिवादन

सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले यांना अभिवादन
लातूर : “मानवाचा एकच धर्म असावा । सत्याने वर्तावा । जोती म्हणे...” असा मानवतेचा संदेश देणारे सत्यशोधक, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या १५३ व्या वर्धापन दिनानिमित्त महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जयंती उत्सव समिती, महाराष्ट्र, महात्मा फुले सेवा मंडळ व सत्यशोधक समाज प्रतिष्ठान यांच्या वतीने महात्मा जोतीराव फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.

यावेळी महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्ष २०२६–२७ निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दत्ता माळी यांनी दिली. तसेच सद्यस्थितीत सत्यशोधक विचारांची गरज, सत्यशोधक विवाह, सामाजिक कार्य आणि समाजप्रबोधन याविषयी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी ज्येष्ठ सत्यशोधक विचारवंत मा. के. ई. हरिदासजी, लातूर जिल्ह्यातील पहिले सत्यशोधकी विवाह दांपत्य विजयश्री व प्राचार्य शिवाजी माडे सर, सत्यशोधक कार्यकर्ते शरदजी झरे, ॲड. प्रदीपजी गंगणे, महात्मा फुले द्विशताब्दी जयंती उत्सव समितीचे मुख्य राज्य समन्वयक दत्तात्रय चांबारगे (माळी), राज्य समन्वयक उत्तमजी गोरे, शाम गोरे, सुनील वांजरवाडे, ॲड. नितीन म्हेत्रे, प्रा. बबीता सोळंके, डॉ. नयन राजमाने, उषा भोसले, तालुका समन्वयक कविता गोरे, मंदोधरी चांबारगे (माळी), मोहन पोतदार, आत्माराम गिरी, तसेच श्लोक माळी, आलोक माळी, ओम माळी, प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم