मतदार यादी मध्ये फेरफार करणाऱ्या मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा घ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर एडवोकेट्स फोरमचे राष्ट्रपतींना निवेदन

मतदार यादी मध्ये फेरफार करणाऱ्या मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा घ्या-डॉ.बाबासाहेब आंबेडकर एडवोकेट्स  फोरमचे राष्ट्रपतींना निवेदन 
लातूर-मतदार याद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या करणाऱ्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार गुप्ता यांचा राष्ट्रपतींनी त्वरित राजीनामा घ्यावा, अशी मागणी लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर एडवोकेट्स फोरमच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविलेल्या निवेदनात केली आहे. 
सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार  यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या मतदार याद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केली आहे, त्यामुळे त्यांचा आयुक्त पदाचा त्वरित राजीनामा घेऊन त्यांना पदावरून हटविण्यात यावे .मतदार यादीतील पुनरिक्षणामुळे लाखो भारतीय नागरिकांना त्यांच्या मतदानाच्या हक्का पासून वंचित ठेवण्याचा कुटील डाव त्यांनी खेळला आहे .लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी आणि मतदारांना त्यांचा संवैधानिक अधिकार बहाल करण्यासाठी ज्ञानेश कुमार यांचा त्वरित राजीनामा घेण्यात यावा. त्यांच्या चुकीच्या निवडणूक कार्यपद्धतीमुळे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे देशाचे संविधान धोक्यात आले आहे. मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेतील अनियमितता ,नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी लागणाऱ्या फार्म सहा मधील नियमबाह्य बदल, पक्षपाती आणि भेदभावपूर्ण वर्तन मतदार डेटा सुरक्षा बाबतची उदासीनता, भाजपाच्या निवडणूक प्रचारासाठी शासकीय डेटाबेसचा गैरवापर आणि निवडणूक आयोगाच्या इतर दोन निवडणूक आयुक्तांना विश्वासात न घेता हुकूमशाही पद्धतीने कारभार ज्ञानेश कुमार यांनी संवैधानिक पदाचा गैरवापर करत केला आहे ,त्यामुळे त्यांचा त्वरित राजीनामा घेण्यात यावा, असे या निवेदनात म्हटले आहे. 
     आज बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या या निवेदनावर फोरमचे अध्यक्ष ॲड. महेंद्र कुमार इंगळे, सचिव ॲड.राजकुमार गंडले, कोषाध्यक्ष ॲड .उद्धव कांबळे उपाध्यक्ष ॲड.श्रीपती चव्हाण, ॲड.सहसचिव बालाजी मेहेत्रे,कार्यकारी सदस्य ॲड दीपक साठे,ॲड प्रदीप पाटील,ॲड. इरफान शेख , ॲड रामराजे आत्राम,ॲड सुनील गायकवाड , ॲड अस्मिता कांबळे ,ॲड.संजय सीतापुरे सल्लागार ॲड विजयकुमार चिखलीकर ॲड लहू सुरवसे, ॲड श्रीधर गायकवाड,ॲड शंकर सूर्यवंशी, प्रसिद्धीप्रमुख ॲड.प्रीतम कांबळे, ॲड.गौरव कांबळे, ॲड रमेश गायकवाड, ॲड .एसएम मादळे ॲड.तसेच आर आर गंडले , ॲड रमेश गंडले, ॲड प्रमोद जाधव, ॲड उमाकांत राऊत, ॲड.एस आय शेख,ॲड आर.ए. सोमवंशी, ॲड .राजेंद्र लातूरकर,ॲड शिवकुमार बनसोडे, ॲड . रमक जोगदंड, ॲड अंगद गायकवाड,ॲड. भारत नन्नवरे, चिन्मई गोजमगुंडे, आर.एन. शितापे,ॲड. प्रतीक कांबळे,ॲड.ऍड प्रदीप गायकवाड,ॲड. परमेश्वर इंगळे,ॲड . दीपक माने इत्यादींची नावे व स्वाक्षऱ्या आहेत..

Post a Comment

أحدث أقدم