डॉ.शिवलिंग नागापुरे यांना द रिंगण लाईव्ह डिजिटल न्यूज व माध्यम समूहाचा गौरव पुरस्कार जाहीर
औसा/प्रतिनिधी -जिल्हा परिषद कन्या प्रशाला भादा येथे कार्यरत असणारे महाराष्ट्र शासन राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ. शिवलिंग नागापुरे यांना द रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा या डिजिटल न्युज व माध्यम समूहाच्या वतीने 'रिंगण गौरव' पुरस्कार जाहीर झाला आहे. द रिंगण लाईव्ह या डिजिटल व माध्यम समूहाच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त रिंगण गौरव सोहळा समितीच्या वतीने रिंगण गौरव आणि रिंगण जीवन गौरव पुरस्कार ह्या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले आहे.डॉ.शिवलिंग उमाकांत नागापुरे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना रिंगण गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.द रिंगण लाईव्ह चे मुख्य संपादक तथा सन्मान सोहळ्याचे संयोजक श्री राजू पाटील यांनी डॉ.शिवलिंग नागापुरे यांना गौरव पुरस्कार चे निवडपत्र देऊन अभिनंदन केले आहे.दोन ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता दयानंद सभागृह लातूर येथे ह्या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री श्री बाबासाहेब पाटील साहेब यांच्या शुभहस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी मंत्री श्री दिलीपरावजी देशमुख साहेब असून कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार श्री बसवराजजी पाटील आहेत. या अत्यंत मानाच्या पुरस्कार सोहळ्यात डॉ. शिवलिंग नागापुरे सरांसोबत मा.शिवाजीराव पाटील कव्हेकर (माजी आमदार लातूर ), मा. गोविंद अण्णा केंद्रे (माजी आमदार उदगीर),मा. वैजनाथराव शिंदे (माजी आमदार लातूर ग्रामीण ), श्री प्रभूअप्पा राचट्टे (मा. अध्यक्ष, मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, औसा ),मा. राजेश्वरराव निटुरे (माजी नगराध्यक्ष उदगीर ),रमेशजी बियाणी (सचिव दयानंद शिक्षण संस्था, लातूर ),मा. शिवचरणजी धाराशिवे (संस्थापक अध्यक्ष, विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडल, आलमला)यांचा रिंगण जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान होणार आहे. डॉ. शिवलिंग नागापुरे यांना यापूर्वीही अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना जाहीर झालेल्या रिंगण गौरव पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
إرسال تعليق