आ. रमेशआप्पा कराड यांची कार्यकर्त्यांची भेट; दुष्काळासह विविध विषयावर चर्चा

आ. रमेशआप्पा कराड यांची कार्यकर्त्यांची भेट; दुष्काळासह विविध विषयावर चर्चा
         लातूर - लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा भाजपाचे नेते श्री. रमेशआप्पा कराड यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती सांगितली असतानाही त्यांनी मतदार संघातील कार्यकर्त्या समवेत दुष्काळासह विविध विषयावर चर्चा केली तर अनेकांनी आ. कराड यांच्या प्रकृतीची अस्थिवायिकपणे चौकशी केली.
        शुगर आणि हृदयाच्या त्रासामुळे लातूर ग्रामीणचे आमदार श्री. रमेशआप्पा कराड हे आजारी होते. त्यांच्यावर पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नुकतीच हृदयाची (अॅन्जोप्लास्टि) शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर परवा शुक्रवारी लातूरला आले. परतू डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती सांगितली होती. आजारपणामुळे तब्बल महिनाभरापासून कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी भाग घेता आला नाही शिवाय कार्यकर्त्यांशी भेटीगाठी, संवाद झाला नव्हता.
        लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघ हेच माझे कुटुंब मानून काम करणारे भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी स्वतःचे आजारपण असतानाही ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थिती आणि जनतेच्या अडचणीची जाणीव लक्षात घेऊन ५ ऑक्टोबर सोमवारी सायंकाळी प्रयाग या त्यांच्या निवासस्थानी मतदार संघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी मतदारसंघासह जिल्हाभरातील अनेकांनी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. विविध गावच्या पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, शासनाचे पंचनामे होत आहेत का? सोयाबीन काढणी सुरू झाली का? याबाबतची माहिती आ. कराड यांनी कार्यकर्त्यांकडून जाणून घेतली. तर अनेकांनी त्यांच्या प्रकृतीची अस्थेवाईपणे चौकशी केली.
      प्रकृती अस्वस्थामुळे मी प्रत्यक्ष कुठे जाऊ शकत नाही, जनतेशी संवाद साधू शकत नाही. दुष्काळी परिस्थितीत राज्य शासन जनतेच्या पाठीशी आहे. तेव्हा कार्यकर्त्यांनी मतदार संघातील गावागावात वाडी वस्तीत शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला धीर द्यावा शासनाच्या दुष्काळी योजनेचा लाभ मिळवून द्यावा असेही आ. रमेशआप्पा कराड यांनी यावेळी बोलून दाखविले.
        दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. बसवराज पाटील, माजी मंत्री आ. संजय बनसोडे, आ. अभिमन्यू पवार यांच्यासह इतर अनेकांनी दूरध्वनी करून आमदार रमेशअप्पा कराड यांच्या प्रकृतीची अस्थिवायिकपणे चौकशी केली.
       यावेळी कराड परिवारातील राजेश कराड, सौ. संजीवनीताई कराड, ऋषिकेशदादा कराड यांच्यासह आ. अभिमन्यू पवार, शैलेश लाहोटी, प्रदीप पाटील खंडापूरकर, नाथसिंह देशमुख, दिलीपराव देशमुख, ओमप्रकाश गोडभरले, त्र्यंबकआबा गुट्टे, सुभाष जाधव, विजय क्षिरसागर, रामेश्वर बद्दर, बन्सी भिसे, सुरज शिंदे, प्रताप पाटील, महेंद्र गोडभरले, अनिल भिसे, पद्माकर चिंचोलकर, वैभव सापसोड, शरद दरेकर, अनंत चव्हाण, अ‍ॅड. मनोज कराड, राजकिरण साठे, अ‍ॅड. दशरथ सरवदे, श्रीकृष्ण जाधव, साहेबराव मुळे, सुनील चेवले, बाबा भिसे, पुंडलिक बेंबडे, गुणवंत करंडे, सुरेखा पुरी, गोविंद नरहरे, महेश गाडे, सुरेश पाटील, देवराव मोहिते, शहानुर बागवान, सय्यद वाजिद, महादेव गुरुशेट्टे, उद्धव काळे, महेश कणसे, ललिता कांबळे, लता भोसले, श्रुती सवई, अनुसया फड, शितल पाटील, शीला आचार्य, निवृत्ती चिद्रे, अभिमान वायबसे, वैजनाथ हराळे, रवींद्र नागरगोजे, गोपाळ पाटील, सुकेश भंडारे, अशोक राठोड, चंद्रकांत कातळे, अनंत पाटील, ओम चव्हाण, दीपक वांगस्कर, श्याम वाघमारे, किशन शिरसागर, मस्तान पेंटर, अंकुश गणगे, अशोक सावंत, विजय मलवाड, श्रीनाथ बंडगर, रुपेश थोरमोठे, सुधाकर काळे, नामदेव बोंबडे, विजय चव्हाण, फुलचंद अंधारे, शरद शिंदे, विश्वास कावळे, सोमनाथ चिल्लरगे, सिद्धेश्वर मामडगे, रमाकांत फुलारी, शुभम खोसे, नारायण राठोड, गोविंद मुंडे, रघुनाथ केंद्रे, ज्ञानेश्वर जुगल, भैरवनाथ पिसाळ, संजय विरुळे, वसंत करमुडे, काशिनाथ ढगे, पांडुरंग बालवाड, सोमनाथ वाघमारे, हनुमंत गव्हाणे, अजित पाटील, प्रशांत शिंदे, दिनकर राठोड, दत्ता सरवदे, अच्युत कातळे, उमेश सोमानी, संतोष राठोड, प्रवीण पाटील, लक्ष्मण नागिमे, मारुती शिंदे, किरण मुंडे, दत्तात्रय जोगदंड, शंकर चव्हाण, बालासाहेब कदम, अ‍ॅड. धनराज शिंदे, भागवत गीते, सुंदर घुले, राजेंद्र काळे, बापूराव चामले, अजय राठोड, श्रीमंत नागरगोजे, गोविंद देशमुख, राजू आत्तार, शेख अजीम, राजकुमार आलापुरे, आदिनाथ मुळे, बालाजी पठाडे, किशोर सुडके, संगमेश्वर ततापुरे, विनायक मगर, प्रकाश पाटील, सतीश बिराजदार, भागवत गुट्टे, अहमद शेख, जलील शेख, विठ्ठल डोंगरे, राम भताने, श्रीकृष्ण पवार, परमेश्वर जाधव, लक्ष्मण खलंग्रे, अच्युत ईरपे, दिलीप पाटील, आप्पासाहेब पाटील, ईश्वर बुलबुले, पांडुरंग बनसोडे, सतीश कात्रे, सुरेश सूर्यवंशी, भीमराव मुंडे, शिवाजी जाधव, भालचंद्र सूर्यवंशी, नाथराव गिते, रमेश लहाडे, संजय डोंगरे, शालिक गोडभरले, सुरेश बुड्डे, सुधाकर दहिफळे, रानबा मुळे, विठ्ठल कस्पटे, आत्माराम जाधव, बालाजी राठोड, हनुमंत कतलाकुटे, सुधाकर खडके, धनंजय जंगमे, बालाजी शिंदे, सदाशिव राठोड, राजेंद्र लोदगेकर यांच्यासह लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील विविध गावचे भाजपाचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते हितचिंतक होते.

Post a Comment

أحدث أقدم