कव्हा गावाला महाराष्ट्रात स्मार्ट व्हिलेज बनविण्याचे कार्य करू - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

 कव्हा गावाला महाराष्ट्रात स्मार्ट व्हिलेज बनविण्याचे कार्य करू - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

लातूर-पूर्वीच्या काळामध्ये कव्हा गाव हे उस्मानाबाद जिल्ह्यातील भांडखोर गाव म्हणून प्रसिध्द होते. 1987 साली कव्हा गावचा सरपंच म्हणून कार्य करीत आहेत. कव्हा गावचा चौफेर विकास करण्याचे कार्य केले. तंटामुक्‍ती गाव समितीचे अध्यक्ष भागवतराव घार यांना सोबत घेऊन गावामध्ये एकता निर्माण करण्याचे कार्य केले. त्यामुळे भांडखोर गावाला तंटामुक्‍तीचे 10 लाखाचे बक्षीस मिळाले. त्यानंतर गावाच्या विकासाला गती मिळाली. दुग्धविकास सोसायटीच्या माध्यमातून अनेक तरुणांना काम मिळाले. गावातील लहानथोर मंडळींना सोबत घेऊन गावामध्ये रस्ते, पाणी यासारख्या सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य केले आणि ग्रामस्थांच्या सामुहिक प्रयत्नातून स्मार्ट व्हिलेज कव्हा गावाला 20 लाखाचे बक्षीस मिळाले. त्यामुळे यापुढील कालावधीमध्ये स्मार्ट व्हिलेज कव्हा गावाला सर्वांच्या सहकार्याने राज्यात स्मार्ट व्हिलेज म्हणून बक्षीस मिळविण्याचे कार्य करू, असे प्रतिपादन कव्हा गावचे भूमिपूत्र तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते कव्हा गावचे उपसरपंच किशोर घार यांचा वाढदिवस दुष्काळाच्या पार्श्‍वभूमिवर सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाला भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा.गोविंद घार, माजी उपसरपंच भानुदास घार, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुदामदादा रूकमे, तंटामुक्‍ती समितीचे अध्यक्ष भागवतराव घार, माजी नगरसेवक असगर पटेल, सुंदर पाटील कव्हेकर, नगरसेवक दत्ता चेवले, प्रा.अशोक पाटील, कांताप्पा पाटणकर, हणमंत बरूरे, नवनाथ बरूरे, विठ्ठलराव घार, घार बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक अजित घार, माजी सरपंच नेताजी मस्के, लक्ष्मण सूर्यवंशी, रसूल पठाण, बालाजी घार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले की, कव्हा गावच्या विकासामध्ये जुन्या व जाणत्या मंडळींचे योगदान मोठे योगदान असले तरी तीच परंपरा पुढे जोपासण्याचे कार्य किशोर घार यांच्या सोबतीची टीम सक्षमपणे करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होऊन त्यांच्या अडचणीत त्यांना आधार देणार्‍या किशोर घार यांना लाख-लाख शुभेच्छा. मी मी सामाजिक, राजकीय, बँकींग व शैक्षणिक कार्यामध्ये कार्य करीत असताना सर्व महात्म्याबरोबरच कव्हा येथील शेखमियाँ दर्गा, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, मारुती मंदिर या बरोबरच कव्हा गावाची पुजा करतो. त्यामुळे या नवीन टीमनेही जे-जे नवं ते ते कव्हा गावाला हवं या उक्‍तीप्रमाणे कव्हा गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील रहावे, कव्हा गावामध्ये 120 कोटीचे विभागीय क्रीडा संकुल, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना याबरेाबरच अनेक कार्यालयाच्या माध्यमातून कव्हा गावाच्या विकासामध्ये भर पडलेली आहे. या गावच्या विकासामुळे जमीनीला मोठे भाव आलेले आहेत. त्यामुळे गावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहून गावचा नावलौकिक जिल्ह्यात, विभागातच नाही तर राज्यामध्ये वाढविण्याचे कार्य करू, असा विश्‍वासही माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्‍त केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वाढविदस संयोजन समितीच्यावतीने प्रमुख मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तसेच सत्कारमूर्ती किशोर घार यांचाही माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर व मान्यवरांच्या उपस्थित शाल, फेटा व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. तसेच दुष्काळाच्या पार्श्‍वभूमिवर गावातील अनेक नागरिकांना बॅलरचे वाटप, गावातील एसटीचे स्मार्ट कार्डचे वाटप व रक्‍तदान अशा सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार पुरी यांनी मानले. यावेळी या कार्यक्रमाला अ‍ॅड.नारायण माने, लक्ष्मण साखरे, परमेश्‍वर खंडागळे, आत्माराम घार,शिवशरण थंबा, वलीपाशा पठाण, लायक पठाण, गोविंद सोदले, गोविंद इरले, गोविंद खंडागळे, मनोज घार,नामदेव मोमले, सचिन घार, अशोक बरूरे, जोशी यांच्यासह कव्हा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
आम्ही विकासाचा पाया रचला कळस चढविण्याचे कार्य किशोर घार यांनी केले
- प्रा.गोविंदराव घार

कव्हा गावामध्ये विविध पक्षामध्ये कार्य करणारे लोकप्रतिनिधी असले तरी गावच्या विकासासाठी आम्ही एकजुटीने कार्य करीत आलेलो आहोत. कव्हा गावच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे कार्य जुन्या ज्येष्ठ मंडळींनी केलेले आहे. आता तीच विकासाची धुरा सांभाळण्याचे कार्य युवा नेते अजित पाटील कव्हेकर, किशोर घार, अजित घार, सुंदर पाटील यांच्यासह अनेक तरुण करीत आहेत. कव्हा गावाच्या विकासात भर पाडण्यासाठी 42 कोटीचा सीएनजी प्रकल्प आणण्याचे कार्य किशोर घार यांनी केलेले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कव्हा गाव व परिसरातील 1000 तरुणांना रोजगार मिळणार आहे. या कार्याबरोबरच कव्हा गावच्या चेहरा मोहरा बदलण्याचे कार्य कव्हा गावच्या तरुण मंडळींनी केलेले आहे.  खर्‍या अर्थाने आम्ही कव्हा गावच्या पाया रचण्याचे कार्य केले आणि त्याला कळस चढविण्याचे कार्य किशोर घार करीत आहेत. असे प्रतिपादन भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा कव्हा गावचे भूमिपूत्र प्रा.गोविंदराव घार यांनी केले.
सामाजिक ऐक्य व सलोखा ठेवून कव्हा परिसराच्या विकासासाठी प्रयत्नशील रहावे  
- अजित पाटील कव्हेकर

कव्हा गावाच्या विकासासाठी पूर्वीच्या काळापासूनच सामाजिक ऐक्य व सलोखा ठेवून कार्य करण्याची परंपरा आजही कायम आहे. कव्हा गावामध्ये शाळा, रस्ते, हॉस्पिटल यासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य किशोर घार यांच्या टीमने केलेले आहे. तीच संस्कृती आजही कायम आहे. या गावामध्ये विभागिय क्रीडा संकुल निर्माण होत असल्यामुळे गावच्या तरुणांना क्रीडा क्षेत्रामध्ये मोठे व्यासपीठ मिळालेले आहे. किशोर घार यांच्यामध्ये सेवाभाव आणि नेतृत्वगुण ठासून भरलेले आहेत.त्यामुळे त्यांनी गावाबरोबरच परिसराचा विकास करण्यासाठी सेवाभाव अंगीकारून प्रयत्नशील रहावे आणि गावातील सामाजिक सलोखा कायम ठेवून कव्हा गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم