ऊस वजनात पारदर्शकता राखण्यासाठी भरारी पथके तैनात; तक्रारीसाठी व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर

 ऊस वजनात पारदर्शकता राखण्यासाठी भरारी पथके तैनात; तक्रारीसाठी व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर

लातूर : सन २०२६-२७ च्या ऊस गाळप हंगामामध्ये सर्व सहकारी व खाजगी साखर कारखान्यांमधील ऊस वजनाबाबत पूर्ण पारदर्शकता, विश्वासार्हता आणि अचूकता राखण्यासाठी लातूर व धाराशिव जिल्हा वैधमापन शास्त्र कार्यालयाच्या वतीने विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

या उपाययोजनांचा भाग म्हणून साखर कारखान्यांमध्ये वापरात असलेल्या सर्व वाहन काट्यांची पडताळणी, मुद्रांकन आणि सीलिंगची प्रक्रिया अधिक पारदर्शी व लोकाभिमुख व्हावी, यासाठी ती प्रक्रिया शेतकरी प्रतिनिधींच्या प्रत्यक्ष उपस्थितीत केली जात आहे. ऊस वजनातील कोणत्याही गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या स्तरावर विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या भरारी पथकांमध्ये महसूल विभाग, पोलीस विभाग, प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालय तसेच शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आला आहे.

ऊस वजनाबाबत शेतकऱ्यांची काही तक्रार असल्यास त्यांनी पुराव्यासह या भरारी पथकाकडे आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय, छत्रपती संभाजीनगर विभागाच्या वैध मापनशास्त्र सह नियंत्रक स्तरावरून शेतकऱ्यांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी ९४०४६४०७५६ हा व्हॉट्सॲप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच खाजगी काट्यावर वजन केल्यानंतर शेतकऱ्यांना काही अडचणी किंवा शंका आल्यास त्यांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर), नांदेड यांच्याकडे तक्रार करावी, अशी माहिती लातूर व धाराशिवचे वैधमापनशास्त्र उपनियंत्रक अ. ध. गेटमे यांनी दिली आहे.

Post a Comment

أحدث أقدم