लॉर्ड श्रीकृष्ण स्कुलमध्ये एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

 लॉर्ड श्रीकृष्ण स्कुलमध्ये एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी


लातूर शहरातील मातोश्री कलावती प्रतिष्ठान संचलित लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सर्वप्रथम शाळेचे अध्यक्ष श्रीकृष्ण लाटे, शाळेच्या प्राचार्या रुपाली कुलकर्णी, शाळेच्या समन्वयिका संगीता शेटे, विद्या पाटील, यांनी एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले.याप्रसंगी शाळेचा विद्यार्थी धृवांश आलमले याने उपस्थित विद्यार्थ्यांना एपीजे अब्दुल कलाम यांच्याविषयी माहिती सांगितली. एपीजे अब्दुल कलाम यांना मुलांबद्दल खूप आपुलकी होती. आपल्या देशातील तरुणांना ते नेहमीच चांगले धडे देत आले आहेत, तरुणांची इच्छा असेल तर संपूर्ण देश बदलू शकतो, असे ते म्हणायचे. देशातील सर्व लोक त्यांना मिसाईल मॅन  या नावाने संबोधतात. डॉ एपीजे कलाम यांना भारतीय क्षेपणास्त्रांचे जनक म्हणून ओळखले जाते.कार्यक्रमाचे सूत्र संचलन शाळेचा विद्यार्थी निखील वाघमारे याने केले. शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم