लातूरकरांच्या विश्वासाला अन् विकासाच्या आकांक्षांना
बळ देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध :
आमदार अमित विलासराव देशमुख
लातूर (प्रतिनिधी) :
लातूरचे सुप्रसिद्ध व्यावसायिक श्री. रामेश्वर पुनपाळे व परिवाराच्या
पुढाकारातून लातूर शहरातील जुनी भांडी गल्ली, गंजगोलाई परिसरात नव्याने
सुरू करण्यात आलेल्या ‘पार्थ किचन ॲक्सेसरीज’ या होलसेल दालनाचा उद्घाटन
समारंभ गुरुवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी राज्याचे माजी
वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा माजी पालकमंत्री, आमदार
अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
‘पार्थ किचन ॲक्सेसरीज’ या दालनाच्या शुभारंभ प्रसंगी राज्याचे माजी
वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा माजी पालकमंत्री, आमदार
अमित विलासराव देशमुख, खासदार मा. डॉ. शिवाजी काळगे, महापौर सौ. जयश्री
सोनकांबळे, उपमहापौर ॲड. स्नेहल उटगे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत
शुभारंभ केला. यावेळी पुनपाळे परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलतांना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री
तथा माजी पालकमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले, नावीन्याचा
ध्यास, प्रयोगशीलता आणि विकासाभिमुख दृष्टिकोन ही लातूरची खरी ओळख आहे.
याच सकारात्मक वृत्तीतून ‘पार्थ किचन ॲक्सेसरीज’सारखे आधुनिक दालन
लातूरमध्ये सुरू होत आहे. लातूरकरांच्या या आकांक्षा ओळखून शहराच्या
आजवरच्या नेतृत्वानेही सातत्याने नवनवीन संधी निर्माण करण्याचा प्रयत्न
केला आहे. त्यामुळेच लातूर शहर आज महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणाऱ्या
शहरांमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे असे याप्रसंगी बोलताना
सांगितले.
लातूरकरांच्या विश्वासाला आणि विकासाच्या आकांक्षांना बळ देण्यासाठी
लोकप्रतिनिधी म्हणून शहर व जिल्ह्याच्या विकासाला पूरक वातावरण निर्माण
करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. राजकीय विरोधकांकडून गैरसमज
पसरवण्याचे प्रयत्न होत असले, तरी त्याकडे दुर्लक्ष करून आमचे काम अविरत
सुरू आहे. आम्ही कुठेही असलो, तरी आमचे लक्ष लातूरकडेच असते शहरातील
प्रत्येक लहान-मोठ्या घडामोडीची दखल घेऊन आवश्यक ती पावले उचलण्याचे काम
आम्ही सातत्याने करत आहोत असे सांगून लातूरच्या प्रगतीला गती देणाऱ्या
प्रत्येक नव्या उपक्रमाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत! अशी
ग्वाहीही याप्रसंगी बोलताना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक
कार्यमंत्री तथा माजी पालकमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी
शेवटी दिली.
यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी या नव्याने सुरू झालेल्या
दालनाच्या शेजारील हॉटेल सेवा यांच्या १० वर्षांपूर्वीच्या आठवणी सांगत
‘पार्थ किचन ॲक्सेसरीज’ च्या शुभारंभाचे कौतुक करून पुढील वाटचालीस
शुभेच्छा दिल्या. प्रारंभी ‘पार्थ किचन ॲक्सेसरीज’ संचालक रामेश्वर
पुनपाळे यांनी दालनाची वैशिष्ठे, उपलब्ध साहित्य, किचन साहित्य याबाबत
उपस्थिताना माहिती दिली.
दरम्यान या नवीन व्यावसायिक उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक बाजारपेठेत
ग्राहकांना अधिक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, ‘पार्थ किचन
ॲक्सेसरीज’ ची मान्यवरांनी पाहणी करून प्रकाश कासट पुढील व्यावसायिक
वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी महापौर जयश्रीताई सोनकांबळे, उप महापौर ॲड. स्नेहल उटगे,
लक्ष्मीरमण लाहोटी, रमेश बियाणी, विजयकुमार साबदे, प्रकाश कासट, फुलचंद
काबरा, हुकुमचंद कलंत्री, बालकिशन मुंदडा, डॉ. हर्षवर्धन राऊत, दिनेश
गिल्डा, विनायक चन्नगिरे, युनूस मोमिन, विकास कांबळे, अभिशेक पतंगे, अशोक
(गट्टू) अग्रवाल, कमल जोधवानी, गिरीश ब्याले, आसिफ बागवान, रामेश्वर
पुनपाळे, श्रीकृष्ण पुनपाळे, डॉ. अजय पुनपाळे, सीमा पुनपाळे, जगदीश
पुनपाळे, पवन पुनपाळे, श्यामसुंदर पुनपाळे, मेहुल पुनपाळे, ईश्वरप्रसाद
पुनपाळे, सागर पुनपाळे यांच्यासह पुनपाळे कुटुंबीय, मित्रपरिवार, भांडी
गल्ली तसेच परिसरातील व्यावसायिक बांधव, नागरिक उपस्थित होते.
إرسال تعليق