महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वूमेन लॉयर्स संघटनेतर्फे बशीर शेख वर कठोर कारवाईची मागणी

 महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वूमेन लॉयर्स संघटनेतर्फे  बशीर शेख वर कठोर कारवाईची मागणी  


लातूर :  येथील आदर्श शिक्षण संस्थेचा सर्व्हेसर्व्हा बशीर शेख याने अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी त्याच्यावर कठोर कारवाई  करण्यात यावी,अशी  मागणी  महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वुमेन लॉयर्स फेडरेशनच्या वतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. 
महाराष्ट्र वूमेन लॉयर्स फेडरेशनच्या अध्यक्षा एड. जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना  निवेदन देण्यात आले. लातूर शहराला दैदिप्यमान शैक्षणिक वारसा लाभलेला आहे. लातूरला शिक्षणाची पंढरी  म्हणूनही ओळखले जाते.असे असताना आदर्श शिक्षण संस्थेचा प्रमुख बशीर  शेख याने अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण  मानवतेला काळिमा फासण्याचे काम केले आहे. अशा लिंगपिसाट नराधमावर कठोरातील कठोर कावरवाई करण्यात यावी. ही कारवाई एवढी कठोर असावी की, भविष्यात अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करण्याचे धाडस कोणताही गुन्हेगार कदापि करणार नाही,अशा आशयाचे निवेदन अ‍ॅड.  जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वुमेन लॉयर्स संघटनेच्या वतीने देण्यात आले. यावेळी  संघटनेच्या जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. सुनंदा मोटे - इंगळे,  जिल्हा सचिव अ‍ॅड. अभिलाषा गवारे,  अ‍ॅड. अरुणा वाघमारे,अ‍ॅड. किर्ती  जाधव, अ‍ॅड. सुरेखा शृंगारे , अ‍ॅड. सोफिया शेख,  अ‍ॅड. मंजुश्री शिंदे, अ‍ॅड. बिना राऊत यांच्यासह महिला वकील संघटनेच्या सदस्या  उपस्थित होत्या. 

Post a Comment

أحدث أقدم