माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याकडून मोरे कुटुंबियांचे सांत्वन

 माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याकडून मोरे कुटुंबियांचे सांत्वन

लातूर-लातूर तालुक्यातील कानडी बोरगाव येथील रहिवाशी तथा कृषी विद्यालयातील प्राध्यापक सुधाकर पंडितराव मोरे (वय 50 वर्षे) यांचे हृदयविकाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, पाच भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
या घटनेची माहीती मिळताच भाजपा नेते तथा किसान मोर्चा गुजरात व गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी लातूर तालुक्यातील कानडी बोरगाव येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन मोरे कुटुंबियाचे सांत्वन केले.
यावेळी मोरे परिवारातील माऊली मोरे, पोपट मोरे, यश मोरे, सुंदरराव मोरे, डॉ.मोरे, राहुल मोरे, गुलाबराव पवार, बब्रुवान पवार, रामराव जाधव, भालचंद्र पाटील, दगडोजीराव डिगे यांच्यासह मोरे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
तसेच माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या समवेत भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके, कमलाकर कदम, बाबासाहेब देशमुख, महादेवराव गायकवाड, उध्दव जाधव, भरत जाजू शेठ आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले मोरे परिवार व कव्हेकर परिवाराचे ऋणानुबंध जुने आहेत आम्ही आपल्या दुःखामध्ये सहभागी आहोत आपणास व आपल्या परिवारास या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो हीच ईश्‍वरचणी प्रार्थना अशी भावणिक प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.

Post a Comment

أحدث أقدم