कौटुंबिक दांडिया महोत्सवात सिने कलाकारांच्या उपस्थितीत होणार ' डफी ' चित्रपटाचे पोश्टर लॉन्च
लातूर : लातूरचे भूमिपुत्र निर्माता - दिग्दर्शक विशाल गिरी यांच्या आगामी मराठी चित्रपट ' डफी' चे पोश्टर लॉन्चिंग सिनेअभिनेते तानाजी गलगुंडे , भूषण मंजुळे, अभिनेत्री चैत्राली चव्हाण,अर्चना सूर्यवंशी यांसह अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी अनुसया मंगल कार्यालय, स्वामी समर्थ मंदिराजवळ. जुना एमआयडीसी रोड, लातूर येथे आयोजित कौटुंबिक दांडिया महोत्सवात होणार असल्याची माहिती विशाल गिरी यांनी दिली.
डफी या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून या चित्रपटात तानाजी गलगुंडे , भूषण मंजुळे, अभिनेत्री चैत्राली चव्हाण,अर्चना सूर्यवंशी, अर्चना मालू आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या पोश्टरचे लॉन्चिंग या कौटुंबिक दांडिया महोत्सवात होणार आहे. यावेळी दांडिया महोत्सवाचे आयोजन विशाल गिरी ऍक्टिंग डान्स अकॅडमीच्या वतीने करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी मुख्य जज म्हणून लोकप्रिय मॉडेल संध्या कुलकर्णी, सलोनी अग्रवाल यांची उपस्थिती लाभणार आहे. त्याचप्रमाणे संवेदनशील लेखक प्रा. भास्कर बडे यांची यावेळी विशेष उपस्थिती असणार आहे. कौटुंबिक दांडिया महोत्सवातील पहिल्या तीन विजेत्यांना सोन्याची नथ आणि पुढील चित्रपटात काम करण्याची संधी दिली जाणार असल्याचे विशाल गिरी यांनी सांगितले.
अनुसया मंगल कार्यालयात सायंकाळी पाच ते दहा या वेळेत होणाऱ्या या दांडिया महोत्सवास लातूर शहर व परिसरातील महिला - भगिनींनी , चित्रपट प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवून सोहळा यशस्वी करावा असे आवाहनही विशाल गिरी यांनी केले आहे.
إرسال تعليق