प्रा. नंदकुमार बालुरे यांना शिक्षणशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

 प्रा. नंदकुमार बालुरे यांना शिक्षणशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान


लातूर :  मथुरा (उत्तर प्रदेश) येथील संस्कृती विद्यापीठाच्या वतीने लातूर येथील सेवानिवृत्त प्राध्यापक नंदकुमार बालुरे यांना शिक्षणशास्त्र विषयात पीएच.डी. (Ph.D.) पदवी प्रदान करण्यात आली आहे.
दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी संस्कृती विद्यापीठाच्या सातव्या पदवीदान समारंभात कर्नाटकचे राज्यपाल महामहीम थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. बी. चेट्टी आणि कुलपती डॉ. सचिन गुप्ता प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रा. नंदकुमार बालुरे हे नांदेड येथील शिवाजी महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी ‘ए स्टडी ऑफ एज्युकेशनल अपॉर्च्युनिटीज् ॲण्ड कॉन्टेक्स्टिअल चॅलेंजेस इन हायर एज्युकेशन इन महाराष्ट्र’ या विषयावर आपला शोधनिबंध मथुरा येथील संस्कृती विद्यापीठाला सादर केला होता. त्यांच्या या शोधनिबंधाची विशेष दखल घेऊन विद्यापीठाच्या वतीने त्यांना पीएच.डी. पदवी बहाल करण्यात आली.
प्रा. बालुरे यांना या संशोधन कार्यासाठी संस्कृती विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागातील डॉ. सरस्वती घोष तसेच शिक्षणशास्त्र विभागाच्या अधिष्ठाता व विभागप्रमुख डॉ. रेणू गुप्ता यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रा. बालुरे यांच्या या उत्तुंग यशाबद्दल प्रा. डॉ. नागोराव कुंभार, डॉ. हंसराज वैद्य, प्रा. डॉ. उन्मेष शेकडे आणि सौ. विजयलता बालुरे आदींनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم