महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षाच्या नियोजनासाठी रविवारी लातूरमध्ये जिल्हास्तरीय बैठक!

महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षाच्या नियोजनासाठी रविवारी लातूरमध्ये जिल्हास्तरीय बैठक!
लातूर : क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्ष २०२६–२७ च्या अनुषंगाने वर्षभर विविध उपक्रमांचे नियोजन करण्यासाठी महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जयंती उत्सव समिती, महाराष्ट्र यांच्या वतीने रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी लातूर येथे जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक सकाळी ११ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, लातूर येथे होणार आहे.
महात्मा जोतीराव फुले यांनी समाजाला दिलेले समता, शिक्षण, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाचे विचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या द्विशताब्दी जयंती वर्षाचे आयोजन करण्यात येत आहे. या निमित्ताने वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक तसेच जनजागृतीपर उपक्रम राबविण्याचे समितीचे नियोजन आहे. या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर समन्वय साधणे, कार्यकर्त्यांची जबाबदारी निश्चित करणे आणि आगामी कार्यक्रमांची दिशा ठरविणे, या दृष्टीने या बैठकीला विशेष महत्त्व आहे.
या बैठकीमध्ये द्विशताब्दी जयंती वर्षाचे नियोजन, जिल्हा व तालुका समन्वयकांच्या जबाबदाऱ्या, महात्मा फुले संदेश यात्रेचे आयोजन, विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम, आरोग्य शिबिरांचे आयोजन, गावोगावी समित्यांची स्थापना तसेच आगामी वर्षभरातील कार्यक्रमांची रूपरेषा यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
महात्मा फुले यांच्या विचारांचा व्यापक प्रचार व प्रसार करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रित येऊन या जयंती वर्षात सक्रिय सहभाग नोंदविण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने या बैठकीस लातूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, समन्वयक, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच लातूर शहर व जिल्ह्यातील तमाम फुलेप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
बैठकीचा तपशील :
- दिनांक : रविवार, २२ नोव्हेंबर २०२६
- वेळ : सकाळी ११ वाजता
- स्थळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, लातूर
अधिक माहितीसाठी संपर्क :
दत्तात्रय किसनराव चांबारगे (माळी)
मो. ९०२१४७९९७५

Post a Comment

أحدث أقدم