भाजयूमोचे प्रदेशाध्यक्ष महाडिक यांचा लातूर दौरा; विविध कार्यक्रम

 भाजयूमोचे प्रदेशाध्यक्ष महाडिक यांचा

लातूर दौरा; विविध कार्यक्रम

 

          लातूर  - भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष युवा नेते कृष्णराज धनंजय महाडिक हे गुरुवार २६ नोव्हेंबर २०२६ रोजी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक ऋषिकेशदादा रमेशआप्पा कराड यांनी दिली.

          प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच कृष्णराज महाडिक हे गुरुवार २६ नोव्हेंबर रोजी लातूर दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्ताने दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे असे सांगून ऋषिकेशदादा कराड म्हणाले की, सकाळी ९.३० वाजता औसा येथे अभिमन्यू पवार यांच्याकडे सदिच्छा भेट, सकाळी ११ वाजता भाजयुमो लातूर शहर जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन, दुपारी १२ वाजता लातूर शहर जिल्हा कार्यकारणी बैठक, दुपारी १ वाजता अजित पाटील कव्हेकर आणि शैलेश लाहोटी यांच्याकडे सदिच्छा भेट, दुपारी २.३० वाजता लातूर एमआयटी येथे युवा संवाद कार्यक्रम, दुपारी ४ वाजता भाजयुमो लातूर जिल्हा ग्रामीण कार्यकारणी बैठक, सायंकाळी ५ वाजता रेणापूर येथे भाजयुमो शाखा उद्घाटन सोहळा आणि आदिशक्ती श्री रेणुका माता मंदिरात आरती व दर्शन, सायंकाळी ६ वाजता आ. रमेशआप्पा कराड यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, रात्री ८ वाजता माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. याप्रमाणे महाडिक यांचा दौरा कार्यक्रम असल्याची माहिती ऋषिकेशदादा कराड यांनी दिली.

Post a Comment

أحدث أقدم