लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उज्ज्वल व पारदर्शक कारभारासाठी 'सहकार पॅनल'च्या पाठीशी उभे राहा- ॲड. उदय गवारे

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उज्ज्वल व पारदर्शक कारभारासाठी 'सहकार पॅनल'च्या पाठीशी उभे राहा- ॲड. उदय गवारे
लातूर-लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व मतदारांना अतिशय नम्र निवेदन करतो की, लातूर जिल्ह्यातली जी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, ती अनेक वर्षांपासून आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्कृष्टपणे चालत आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत 'सहकार पॅनल'च्या पाठीशी उभा राहून स्वच्छ, पारदर्शक कारभार, शेतकरी व सर्व सामान्य हिताचा जपणूक करणाऱ्या सहकार पॅनलच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन ॲड. उदय गवारे आणि त्यांच्यासोबत सार्वजनिक जीवनात कार्यरत अनेक विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते व बुद्धिवंतांनी केले आहे.


या निमित्ताने पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, केवळ मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रातल्या पहिल्या पाच बँकांमध्ये या बँकेची गणना होते. आपण पाहतोय की काही ठिकाणच्या जिल्हा मध्यवर्ती बँका पार तोट्यात आल्या आणि बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत लातूरची ही बँक, जिचे भागभांडवल कोट्यवधी रुपयांचे आहे, कर्जवाटपही तेवढ्याच सक्षम पद्धतीने होते, त्या ठिकाणचा असणारा कर्मचारी वर्ग हा गुणवत्तेवर निवडला जातो. विशेषतः या ठिकाणी असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. आणि या सगळ्याचे श्रेय जर कोणाला जात असेल, तर ते आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांना जाते. म्हणून ही बँक चांगली आहे, त्याचे कौतुक केलेच पाहिजे. राजकीय विचारसरणी भिन्न असू शकते, राजकीय विचार वेगळा असू शकतो, परंतु आदरणीय दिलीपराव देशमुखांनी बँकेचे पॅनल करताना पक्षाच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना एकत्र करून हे 'सहकार पॅनल' तयार केले. म्हणून आपण त्यांच्या पाठीशी उभे राहूया आणि सहकार पॅनलला जास्तीत जास्त मतांनी त्यांचे उमेदवार निवडून आणावेत. चार उमेदवार त्यांचे आधीच बिनविरोध संचालक आलेले आहेत. अजून १५ जागांसाठी निवडणूक होत असून १५ जागांसाठी होत असलेल्या सर्व उमेदवारांना सहकार पॅनलच्या ज्यांचे निवडणूक चिन्ह 'शिट्टी' आहे त्या शिट्टीच्या चिन्हावर मतदान करावे, अशी कळकळीची विनंती केली आहे 

या निवेदनावर आणि आवाहनात ॲड. भाई उदय गवारे, सुपर्ण जगताप, डॉ. बी. आर. पाटील, डॉ. कल्याण बरमदे, सूर्यप्रकाश धूत, माधव बावगे, ॲड. किशनराव बेंडकुळे (अहमदपूर), प्रा. हर्षवर्धन कोल्हापूरे, ॲड. आर. वाय. शेख, सूर्यकांत वैद्य, मकरंद जाधव, बसवंत बरडे, ॲड. विजय जाधव, डॉ. नीलम पन्हाळे, रजनी वैद्य, प्रा. दत्ता सोमवंशी, प्रा. सुधीर अनवले, विद्याधर कांदे पाटील, नरसिंह इंगळे, भाऊसाहेब उमाटे, बाळकृष्ण धायगुडे, अमर देशमुख, वैभव तळेकर, अजय पाटील नळेगावकर (उदगीर), ॲड. सुशील सोमवंशी (निलंगा), गोविंद पवार (जळकोट), कॉ. उत्तम होळीकर, ॲड. कालिदासराव देशपांडे, प्रा. मनमथ पंचाक्षरी, धर्मराज पाटील, कॉ. विश्वंभर भोसले, बसवराज उटगे, कॉ. संजय मोरे, विजय दबडगावकर, कॉ. सुधाकर शिंदे, भास्कर मुसांडे, अरुण कुलकर्णी, चंद्रकांत साळुंके, प्राचार्य पी. जी. भिसे, प्रताप भोसले, राहुल लोंढे, राजश्री कांबळे यांच्यासह लातूर जिल्हयातील अनेक विचारवंत, शेतकरी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

Post a Comment

أحدث أقدم