विद्यापीठ स्तरीय आविष्कार संशोधन महोत्सवात शिवलिंगेश्वर फार्मसी च्या पाच संशोधन प्रकल्पांची राज्यस्तरीय फेरीसाठी निवड


विद्यापीठ स्तरीय आविष्कार संशोधन महोत्सवात शिवलिंगेश्वर फार्मसी च्या पाच संशोधन प्रकल्पांची राज्यस्तरीय फेरीसाठी निवड

आलमला (प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या वतीने आयोजित विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन महोत्सव २०२६–२७ मध्ये शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, आलमला येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. महाविद्यालयाच्या तब्बल पाच संशोधन प्रकल्पांनी विविध विभागांत पुरस्कार प्राप्त करून राज्यस्तरीय फेरीसाठी निवड मिळवली आहे.
पुरस्कारप्राप्त विद्यार्थी व मार्गदर्शक : मानव्यविद्या, भाषा आणि ललित कला पदवी - अनुष्का भोसले - द्वितीय क्रमांक -मार्गदर्शक : डॉ. धाराशिवे व्ही. एम., कृषी आणि पशुसंवर्धन पदव्युत्तर- सोहम उलागड्डे — द्वितीय क्रमांक -मार्गदर्शक : डॉ. कुलकर्णी एस. एस., अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी -श्रद्धा कापसे — प्रथम क्रमांक मार्गदर्शक : डॉ. धाराशिवे व्ही. एम., अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान – पदव्युत्तर -गौतम दुर्गम — द्वितीय क्रमांक मार्गदर्शक : डॉ. गिरी ए. बी., अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान – पदव्युत्तर-ओंकार कोटगिरे — तृतीय क्रमांक मार्गदर्शक : डॉ. वाडेवाले व्ही. बी.
संस्थेचे अध्यक्ष शिवचरण धाराशिवे, उपाध्यक्ष प्रभाकर कापसे, सचिव बसवेश्वर धाराशिवे, सहसचिव महादेव खिचडे, प्राचार्य डॉ. विश्वेश्वर धाराशिवे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला योग्य दिशा देऊन त्यांना विद्यापीठ स्तरावर यश मिळवून देणाऱ्या मार्गदर्शक प्राध्यापक व समन्वयिका येलम व्ही एम (कापसे) यांचेही कौतुक करण्यात आले.
एकाच वेळी पाच प्रकल्पांची राज्यस्तरीय फेरीसाठी झालेली ही निवड शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसीच्या उच्च दर्जाचे संशोधन, नवोपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा अधोरेखित करणारी ठरली आहे. राज्यस्तरीय फेरीतही हे विद्यार्थी अशीच उल्लेखनीय कामगिरी करतील, असा विश्वास महाविद्यालयाच्या वतीने व्यक्त करण्यात आला. 




Post a Comment

أحدث أقدم