माहेश्वरी टॅलेंट सर्च २०२६ परीक्षेत चि. राघव सोमाणी मराठवाड्यातून प्रथम!

माहेश्वरी टॅलेंट सर्च २०२६ परीक्षेत चि. राघव सोमाणी मराठवाड्यातून प्रथम!
लातूर : श्री हरिकिशनजी बजाज मेमोरियल ट्रस्ट संचलित माहेश्वरी शिक्षण विकास संस्था, नांदेड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘माहेश्वरी टॅलेंट सर्च २०२६’ या मराठवाडा स्तरीय परीक्षेत लातूरच्या चि. राघव भुषण सोमाणी याने घवघवीत यश संपादन करत मराठवाड्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
चि. राघव सोमाणी हा लातूरमधील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व लक्ष्मीकांतजी सोमाणी यांचा नातू आहे. त्याने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे माहेश्वरी समाजासह संपूर्ण लातूर शहराची मान उंचावली आहे. राघवच्या यशामागे त्याची मेहनत, जिद्द आणि अभ्यासातील सातत्य महत्त्वपूर्ण ठरले आहे.
या यशाबद्दल चि. राघव भुषण सोमाणी याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Post a Comment

أحدث أقدم