स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे विवेकानंद पोलिसांची दमदार कामगिरी, विविध गुन्ह्यातील 45 लाख रुपयांचा मुद्देमाल फिर्यादीना केला परत

स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे विवेकानंद पोलिसांची दमदार कामगिरी,

 विविध गुन्ह्यातील 45 लाख रुपयांचा मुद्देमाल फिर्यादीना केला परत


         लातूर-पोलीस ठाणे विवेकानंद व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावत आरोपींना बेड्या तर ठोकल्याच त्यानंतर चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवलं आहे. चोरीच्या गुन्ह्यातील तब्बल 90 तोळे दागिन्याचा दागिन्याचा मुद्देमाल संबधित तक्रारदारांना परत करण्यात आला आहे
               लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी, चे एकूण 13 गुन्हे दाखल होते. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर श्री.जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, व पोलीस ठाणे विवेकानंद चे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करण्याकरिता पथके तयार करण्यात आली होती.
                सदर पथकानी कारवाई करत सर्वच गुन्ह्यांची उकल केली असून नमूद गुन्ह्यातील मोक्का सारख्या कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आलेल्या अतिशय सराईत व कुख्यात अशा एकूण आठ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता.
            पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे निर्देशान्वये कायदेशीर बाबींची पूर्तता करून चोरीस गेलेले 45 लाख रुपयांचे 90 तोळे सोन्याचे  दागिने संबधित नागरिकांना परत करण्यात आले आहे.दिनांक 29/08/2022 रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे, पोलीस निरीक्षक  सुधाकर बावकर यांच्या उपस्थीत पोलीस ठाणे विवेकानंद येथे घेण्यात आलेल्या छोटेखाणी कार्यक्रमात संबधित फिर्यादी मूळ मालक असलेल्या नागरीकांना मुद्देमाल परत देण्यात आले. चोरीस गेलाल माल पुन्हा नागरीकांना मिळाल्याने नागरीकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
[

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने