डॉ. संजय काळे यांची प्राणीशास्त्र विषय अभ्यास मंडळ सदस्यपदी निवड

डॉ. संजय काळे यांची प्राणीशास्त्र विषय अभ्यास मंडळ सदस्यपदी निवड













औसा: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत अभ्यास मंडळ निवडणूक 2022 नुकतीच पार पडली. या निवडणुकीत श्री कुमारस्वामी महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रोफेसर डॉ. संजय काळे हे प्राणीशास्त्र विषय अभ्यास मंडळ सदस्यपदी निवडून आले आहेत. या निमित्त महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात श्री महंतस्वामी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव गिरीश पाटील यांच्या हस्ते डॉ. संजय काळे यांचा सत्कार करण्यात आला.
     डॉ. काळे यांची प्राणीशास्त्र विषय अभ्यास मंडळावर सदस्य  म्हणून  निवड होणे ही बाब महाविद्यालयासाठी भूषणावह असल्याचे मत यावेळी बोलताना गिरीश पाटील यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. सुभाष मिसाळ, ग्रंथपाल प्रा. अंबादास खिलारे, डॉ. कर्मवीर कदम, डॉ. सुनील पुरी, प्रा. युवराज धसवाडीकर, डॉ.  जांबुवंतराव कदम, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. चंद्रकांत पाटील, डॉ. सुधीर गरड, डॉ. प्रविण कांबळे,  डॉ. विनायक वाघमारे, डॉ. अनिता ढोले, डॉ.  दिपा धावारे, डॉ. बळवंत घोगरे यांच्यासह सर्व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने