औसा तालुका मुख्याध्यापक संघाच्या तालुध्यक्षपदी नागनाथ सोमवंशी यांची निवड

औसा तालुका मुख्याध्यापक संघाच्या तालुध्यक्षपदी नागनाथ सोमवंशी यांची निवड


औसा-लातूर जिल्हा खाजगी मुख्याध्यापक संघाची बैठक मुख्याध्यापक गोविंद बागल यांच्या अध्यक्षतेखाली मुक्तेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, औसा येथे औसा तालुका मुख्याध्यापकाची बैठक  संपन्न झाली.नूतन कार्यकारी मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली.
 यामध्ये औसा येथील जिजामाता विद्यालयाचे मुख्याध्यापक नागनाथ सोमवंशी यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली .तसेच रमेश मलवाड यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आणि सचिव म्हणून विजयकुमार यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहसचिव एस. व्ही. माळी  कोषाध्यक्ष कांबळे .आर .वाय सदस्य श्रीमती पाटील. ए .आर व श्रीमती जाधव. ए .एस.यांची निवड करण्यात आली.निवड प्रक्रियेत लातूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख ,अनिल मुळे ,बालाजी बिरादार तसेच सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक गोविंद बागल यांनी केली तर आभार अनिल मुळे यांनी मानले .निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व सत्कार जिल्हाध्यक्ष प्रकाश देशमुख व औसा तालुका परीक्षा मंडळ अध्यक्ष अनिल मुळे यांच्या वतीने करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने