तपोरत्न तर्फे गुणवंताचा सत्कार

तपोरत्न तर्फे गुणवंताचा सत्कार
लातूर/प्रतिनिधी - नारायण नगर लातूर येथील तपोरत्न स्पर्धा परीक्षा केंद्र तर्फे गिरवलकर मंगल कार्यालयामध्ये शिष्यवृत्ती धारक तसेच विविध स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या तब्बल ५१ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
      कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री प्रदीप ढेंकरे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त सृष्टी जगताप तिच्या आई-बाबासह उपस्थित होते तसेच नूतन पी.एस.आय.शितल चिल्ले या उपस्थित होत्या.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक श्री अनिल कल्याणी यांनी केले.सृष्टीने वर्ल्ड रेकॉर्डची संपुर्ण माहीती सांगितले.शितल चिल्ले यांनी स्पर्धा परीक्षाबद्दल माहीती सांगितली.
अध्यक्षीय समारोपात प्रदीप ढेंकरे यांनी अभ्यास कसा करावा?तसेच स्पर्धा परीक्षा तयारी यावर विस्तृत मार्गदर्शन केले.तसेच पालकामधून महेश बिराजदार यांनी क्लासचे वैशिष्टये विषद केले.
     कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रमाकांत हाडोळे व गौरी बोळेगावे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री दत्तात्रय बेद्रे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ.सुनंदा कल्याणी,सौ.पूजा कल्याणी,दत्तात्रय बेद्रे,प्रविण गोरे,सगर सर,अनिल कल्याणी आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने