मारुती महाराज साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी शाम(बापू) भोसले तर उपाध्यक्षपदी सचिन पाटील यांची निवड

मारुती महाराज साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी शाम(बापू) भोसले तर उपाध्यक्षपदी सचिन पाटील यांची निवड
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार 

लातूर- जिल्ह्यातील मांजरा साखर परिवारातील सदस्य असलेला बेलकुंड येथील संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे नूतन चेअरमन म्हणून शाम भोसले (मातोळा) तर व्हॉईस चेअरमन म्हणून सचिन पाटील (मंगरूळ) यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून मांजरा साखर परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या सूचनेनुसार दोन्ही युवकांना संधी मिळाली असून निवडीची घोषणा मंगळवारी निवडणूक अधिकारी यांनी केली आहे तत्पूर्वी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे जाहिर करण्यात आले आहे 


तत्पूर्वी पक्ष श्रेष्ठीकडून निरीक्षक म्हणून राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, सचिन दाताळ अँड प्रवीन पाटील यांनी सर्व संचालक यांच्यासोबत चर्चा केली त्यानंतर नियमानुसार जिल्हा उपनिबंधक निवडणूक अधिकारी श्री बदनाळे यांचे सहाय्यक श्री नबी यांच्याकडे अध्यक्ष पदासाठी शाम भोसले व उपाध्यक्ष पदासाठी सचिन पाटील यांचे दोन्ही पदासाठी एकेक अर्ज भरण्यात आले त्यामुळे बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले आहे

यावेळी संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याचे नूतन संचालक अँड श्रीपतराव काकडे,संचालक गणपत बाजुळगे, अँड बाबासाहेब गायकवाड, शामराव साळुंखे, सुभाष जाधव, भरत माळी, गोविंद सोनटक्के, संतोष भोसले, अनिल पाटील,रमेश वळके,विलास काळे, सौ निवेदिता पाटील, सौ शुभांगी बिराजदार प्रभारी कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने