गोदावरी इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मध्ये “दिक्षाआरंभ सोहळा” उत्साहात साजरा..!

गोदावरी इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी  मध्ये  “दिक्षाआरंभ  सोहळा” उत्साहात साजरा..!




लातूर प्रतिनिधी- तालुक्यातील कोळपा येथील शैक्षणिक क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा निर्माण करणाऱ्या गोविंदप्रभू ग्रामीण व शहरी सेवाभावी संस्था ता. जि.लातूर द्वारा संचालित गोदावरी इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी कडून या महाविद्यालयात शै.वर्ष २०२२-२३ मध्ये बी. फार्मसी डी. फार्मसी यासह बी. फार्मसी थेट द्वितीय वर्ष नूतन प्रवेश घेतलेले विद्यार्थ्यांचे “दिक्षाआरंभ कार्यक्रम” शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.

                 कार्यक्रमाची सुरुवात द्वीपप्रज्वलनाने करण्यात आली, कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून चन्ना बसवेश्वर कॉलेज फार्मसी चे प्राचार्य डॉ. श्री एस.एस. थोंटे, संस्थेचे अध्यक्ष श्री रामेश्वर केवळराम, श्री राहुल केवळराम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. सोळुंके, एम. डी.ए. इन्स्टिटयूट ऑफ पॉलिटेक्निक चे प्राचार्य डॉ. एन. पी. शिवपुजे, श्री व्ही. डी. देशमुख कॉलेज ऑफ एम. सी. ए. चे प्राचार्य पी. आर. केवळराम इत्यादी उपस्थित होते.

                प्रमुख पाहुणे डॉ. श्री एस.एस. थोंटे यांनी आपल्या मार्गदर्शनात औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमाबाबत सखोल मार्गदर्शन करून या क्षेत्रातील संधी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा वेध घेण्यासाठी लागणारी तयारी या बद्दल माहिती दिली तसेच गोदावरी इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. आर. एस. सोळुंके यांनी डी व बी फार्मसी चे जागतिक महत्व विविध उदारहरणांद्वारे पटवून दिले व सदरील महाविद्यालयाचे निवड केल्याबद्दल सर्व विद्यार्थांचे अभिनंदन केले,डॉ. एन. पी. शिवपुजे यांनी आपल्या आई वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेऊन आपल्याला भेटलेल्या संधीचे सोने करावे असे सांगून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.

           कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे अध्यक्ष श्री रामेश्वर केवळराम यांनी उपस्थित मान्यवर व विद्यार्थी यांचे स्वागत केले व महाविद्यालयातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांनी आपले उज्ज्वल भविष्य घडवावे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एस. जी. थोरात यांनी केले व सूत्रसंचालन प्रा. एस. एन. सोनकांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन एस. पी. पांचाळ यांनी केले या कार्यक्रमासाठी विद्यार्धी, पालक, शिक्षक, व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते  व "दिक्षारंभ प्रोग्रामला" उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने