नितीन गावकरे यांना पीएचडी प्रदान 

 



            लातूर राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूल मधील संस्कृत विषयाचे शिक्षक नितीन दत्तात्रय गावकरे यांना मध्य प्रदेशातील सांची युनिव्हर्सिटी ऑफ बुद्धिस्ट इंडिक स्टडीजने संस्कृतमध्ये पीएचडी पदवी प्रदान केली आहे.सांची विद्यापीठातील संस्कृत विभाग प्रमुख डॉदेवेंद्र सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी "मैत्रयणी आरण्यका का समीक्षात्माकाध्यानया विषयावर नितीन गावकरे यांनी शोध प्रबंध सादर केला होताविद्यापीठाने त्यांचा संशोधनास मान्यता देऊन पीएचडी पदवी प्रदान केलीऔसा येथील रहिवाशी असलेले नितीन गावकरे यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठनवी दिल्ली येथून संस्कृतमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून त्यांचे राष्ट्रीय स्तरावरील मासिकात संशोधनात्मक लेख प्रसिद्ध झाले आहेत.

         श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शैलेश लाहोटीराजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष आनंद लाहोटीमुख्याध्यापक कर्नल श्रीनिवासुलूप्रवीण शिवनगीकरविनोद चव्हाणडॉ.सतीश जाधवबल्लालनाथ कुलकर्णीडॉ.भूपेंद्र वानखेडेडॉ अंकुश तनपुरे यांनी त्याचे अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने