लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कुल मध्ये बुद्धीचा देवता गणरायाची प्रतिष्ठापना

                 लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कुल मध्ये बुद्धीचा देवता गणरायाची प्रतिष्ठापना 




लातूर-मातोश्री कलावती प्रतिष्ठान संचालित लातूर येथील लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कुल मध्ये बुद्धीची देवता श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.यावेळी लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कुल च्या चिमुकल्यांनी लेझीम, ढोल ताशांच्या गजरात, उत्साहात गणरायाचे स्वागत केले. चिमुकल्यांच्या ‘‘गणपती बप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया’’ जयघोषाचा आवाज शाळेच्या परिसरात घुमला. यावर्षी शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या मंडळांच्या

कमिटी मेंबरची निवड लकी ड्रॉ पद्धतीने केली. त्यानुसार लॉर्ड श्रीकृष्ण बाल  गणेश  मंडळाचे अध्यक्ष प्रथम गायकवाड, प्रद्युम्न स्वामी, ओम वाघमारे, उपाध्यक्ष शिवप्रसाद बंडगर, प्राची बिरले, उर्जित चौधरी सचिव ओवी शिरसाट, आरुष गिरी,कोषाध्यक्ष वेदांत कावळे, सोहम पाटील, दीप्ती केंद्रे, इरफान शेख, व्यवस्थापक धृवंश अलमले, वैष्णवी बरुरे,गजानन झुंजारे, स्वरा सोळंके, आयोजक पृथ्वीराज माळी, आलीया शेख, श्रावणी शेळके, सह आयोजक अनिरुद्ध सगर, अमोघ लाटे, ईश्वरी बावणे, प्रसिद्धी प्रमुख ऋषिकेश देवकाते, अवधूत शिंदे, गीत गायकवाड यांची निवड करण्यात आली. शाळेच्या परिसरात गणपती बप्पांचे आगमन झाल्यानंतर सर्व प्रथम लेझीम आणि झांज पथकाने आपले प्रात्यक्षिक दाखवले व नंतर गणपतीच्या गाण्यावर विध्यार्थ्यानी ठेका धरला व मोठ्या जयघोषाने बाप्पांचे स्वागत अतिशय हर्षोल्हासात केले. यावेळी श्रीकृष्ण लाटे, कविता लाटे, प्राचार्या दुर्गा भताने शाळेचे समन्वक रौफ शेख, सांस्कृतिक विभाग प्रमुख नम्रता डांगे, क्रीडा विभाग प्रमुख सुजित माळी व लॉर्ड श्रीकृष्ण बाल गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रथम गायकवाड, प्रद्युम्न स्वामी, ओम वाघमारे यांच्या हस्ते गणरायाच्या मुर्तीची पूजा व आरती करण्यात आली. गणेशोत्सव काळात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव


 मिळण्यासाठी शाळेने विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे.यानंतर अथर्वशीर्ष व मंत्र पुष्पांजली चे पठण करून बुद्धीची देवता लॉर्ड श्री गणेशाला शाळेच्या विद्यार्थ्यांनी बाप्पांना अभिवादन करुन प्रसाद घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता डांगे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने