गोसावी समाजाचे रविवारी अधिवेशन

 गोसावी समाजाचे रविवारी  अधिवेशन


 छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते होणार उद्घाटन



   
 लातूर-गोसावी समाज युवा प्रतिष्ठान लातूरचे हे रौप्य महोत्सवी वर्ष.या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त  रविवारी दयानंद सभागृह सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे अधिवेशनाचे उद्घाटन श्रीमंत युवराज छञपती संभाजीराजे यांच्या हस्ते होणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अभिमन्यू पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गोसावी समाजाचे राष्ट्रीय नेते योगेश बन (नागपूर)तर प्रमुख  मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध युवा कीर्तनकार अविनाश भारती यांच्या सह युवा उद्योजक सुखदेव गिरी (कोल्हापूर),शिवसंभा गोसावी (पुणे)आंतरराष्ट्रीय योग सद्गुरू डॉ कृष्णदेव गिरी,युवा सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत गिरी (हडपसर) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अशी माहिती अधिवेशनाचे संयोजक अनिल पुरी यांनी प्रसिध्दी पत्रकात दिली.या अधिवेशनात उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील गोसावी ,डॉ.अशोक बन (परभणी)धनराज गिरी (उमरगा),राजश्री गोसावी (सांगली)आदी मान्यवरांना "राज्य समाज"भूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.उपक्रमशील व आदर्श कार्य संघटना म्हणून दशमान युवक प्रतिष्ठान परभणी यांचा ही या वेळी सन्मान केला जाणार आहे.आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण केलेल्या प्रा.संतोष गिरी (नांदेड),अमित पुरी (बर्दापुर),गोविंद गिरी (अहमदपूर),केतन पुरी (धाराशिव),सौ.अनिता भारती (अंबेजोगाई),सुनील भारती (जालना)प्रमोद गोसावी (बार्शी)आदी मान्यवरांना"गौरव कर्तृत्वाचा"या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.तर सौ.सुनिता पुरी,सौ.पूनम गिरी,दिलीप गिरी,दत्ता पुरी,शंकर गिरी,बंडू पुरी आदी समाज बांधवांना विशेष पुरस्काराने या वेळी गौरविण्यात येणार आहे.या अधिवेशनात इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जाणार आहे.तर अधिवेशनाच्या दुपारच्या सत्रात राज्य स्तरीय वधू-वर मेळावा आयोजित करण्यात आला आहे.तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी या महा अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आवाहन गोसावी समाज युवा प्रतिष्ठान लातूरच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने