'महात्मा बसवेश्वर' मध्ये जिल्हास्तरीय देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा

      महात्मा बसवेश्वरमध्ये जिल्हास्तरीय देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा

लातूर : येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि लातूर जिल्हा भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर जिल्ह्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता जिल्ह्यास्तरीय देशभक्तीपर समूहगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दि. 25/08/2022 रोजी सकाळी 10:00 वाजता महाविद्यालयीन सांस्कृतिक सभागृहात आयोजित केला असून उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री. माधवराव पाटील टाकळीकर हे असणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, डॉ. राजेंद्र अवस्थी, स्पर्धाप्रमुख डॉ. संदीपान जगदाळे, प्राचार्य प्रो. डॉ. सिद्राम डोंगरगे, प्रो. डॉ. श्रीकांत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.उद्घाटन समारंभानंतर लागलीच समूह गीतगायन स्पर्धा सांस्कृतिक सभागृहात संपन्न होणार असून लातूर जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील स्पर्धकांकरिता खालील नियम व अटींचे पालन करणे अनिवार्य आहे.नियम व अटी :देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत एका महाविद्यालयाचा एकच संघ (कनिष्ठ महाविद्यालयाचा एक व वरिष्ठ महाविद्यालयाचा एक) सहभागी होऊ शकतो.स्पर्धकांची संख्या 6 असेल व वादक साथीदार संख्या 5 असेल एकूण जास्तीत जास्त 11 जणांचा संघ असेल.समूह गायनाकरिता एकूण 6 ते 8 मिनिटांचा वेळ असेल.समूह गायन स्पर्धेत केवळ देशभक्तीपर गीत सादर करणे बंधनकारक असेल.5) सादरीकरणाच्या पूर्वतयारीसाठी केवळ 3 मिनिटांचा वेळ दिला जाईल.6) स्पर्धेसाठी वाद्य, वादक व इतर साहित्याची व्यवस्था प्रत्येक महाविद्यालयाने स्वतः करावी.
7) स्पर्धेसाठी मुले-मुली किंवा मुली-मुले यांचा मिळून संघ असू शकेल.8) देशभक्तीपर समूह गायन स्पर्धा ही मराठी व हिंदी या दोन भाषेतून चालेल.9) गुणदान व परीक्षण हे गीताची निवड, स्वरचनेचे नाविन्य, ताल, गती, सादरीकरण व एकत्रित परिणाम
     यावरून केले जाईल.10) सादरीकरण करत असलेल्या गीताची संहिता लिखित स्वरूपात सादर करावे.11) प्रथम विजेता संघास ₹3000/-, द्वितीय विजेत्या संघास ₹2000/- व तृतीय विजेत्या संघास ₹1000/- असे पारितोषिक दिले जाईल.12) जिल्ह्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विजेत्या संघास विद्यापीठस्तरीय स्पर्धेत सहभागी होता येईल.13) परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
14) या स्पर्धेचे सर्व नियम सर्व सहभागी स्पर्धकांना बंधनकारक राहतील.या समूह देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचा लातूर जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन संगीत व सांस्कृतिक विभागाच्या स्पर्धकांनी सहभाग घेऊन स्पर्धेचा लाभ घ्यावा. असे आवाहन लातूर जिल्हा अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र अवस्थी व समिती सदस्य महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सिद्राम डोंगरगे, महाविद्यालयीन अमृत महोत्सव समितीचे समन्वयक प्रो. डॉ. श्रीकांत गायकवाड व समिती सदस्य सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ. दिनेश मौने, डॉ. यशवंत वळवी, डॉ. जितेंद्र देशमुख, डॉ. शीतल येरूळे, प्रा. शिवशरण हावळे, प्रा. विजयकुमार धायगुडे, प्रा. विश्वनाथ स्वामी, डॉ. श्रद्धा अवस्थी, डॉ. उमा कडगे, डॉ. अश्विनी रोडे, प्रा. गीता गिरवलकर, प्रा. वैशाली जयशेट्टे, प्रा. गोविंद पवार आदींनी केले आहे.अधिक माहितीसाठी :प्राचार्य डॉ. सिद्राम  डोंगरगे - मो. 9860603999 डॉ. रत्नाकर बेडगे - 9823697402, 9405315356डॉ. दिनेश मौने - 9922244282टीप : आपल्या महाविद्यालयाच्या संघाची नोंदणी दिनांक 24/8/2022 रोजी सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत महाविद्यालयाच्या principalmbcl@gmail.com या ईमेल वर प्राचार्यांच्या पत्रासह पाठवणे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने