दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ, बाभळगावचे नूतन संचालक मंडळ जाहीर
बाभळगाव : मौजे बाभळगाव ता. जि. लातूरच्या ग्रामीण परिसरात शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ, बाभळगावच्या संचालक मंडळाची बैठक संस्थेच्या कार्यालयात माननीय श्री. दिलीपराव देशमुख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यामध्ये नूतन संचालक मंडळाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
त्यामध्ये दयानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे तज्ञ संचालक म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा. श्री. दिलीपराव देशमुख साहेब तर संस्थेचे अध्यक्ष म्हणून आमदार श्री.धीरज विलासराव देशमुख, उपाध्यक्ष श्री.ओमप्रकाश रघुनाथराव पाटील, श्री.नरसिंह रंगनाथराव देशमुख, सचिव श्री.शाम माणिकराव देशमुख, सहसचिव श्री.महादेव गंगाराम जटाळ, कोषाध्यक्ष श्री.आयुब महंमद हनीफ शेख तर संचालक म्हणून श्रीमती सुवर्णा शहाजीराव मुळे, श्री.भिमराव नागनाथराव शिंदे, श्री.सूर्यकांत विठ्ठलराव देशमुख, श्री. मारुती दगडू मस्के, डॉ. सोपानराव जटाळ यांचा पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या कार्यकारणीत समावेश करण्यात आला.
निवड करण्यात आलेल्या सर्व संचालक मंडळाचे लातूर शिक्षण क्षेत्रातील सर्व मान्यवरांच्या व बाभळगाव पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा